कर्जतमध्ये महाविकास आघाडीचे ठरेना

कर्जत नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीतील ( Mahavikas Aghadi ) पक्षांचे जागा वाटप निश्चित झालेले नाही.
 महाविकास आघाडी
महाविकास आघाडीसरकारनामा

कर्जत ( अहमदनगर ) : अहमदनगर जिल्ह्यातील चार नगरपंचायती सार्वत्रिक तर महापालिकेच्या एका प्रभागातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. उद्या ( मंगळवार ) उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. यात महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या जागा वाटपाचा निर्णय झालेला नाही. आज सायंकाळपर्यंत हा तिढा सुटला नाही तर महाविकास आघाडीतील ( Mahavikas Aghadi ) पक्षच एकमेकांविरोधात दिसणार आहेत. याच माजी मंत्री राम शिंदे ( Ram Shinde ) यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप ( BJP ) कर्जतमध्ये शक्तिप्रदर्शन करणार आहे. The Maha Vikas Aghadi in Karjat is yet to be decided

कर्जत नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना युती-महाआघाडीचा अद्यापि सस्पेन्स आहे. पक्षाचे नेतृत्व व इच्छुक आपले पत्ते ओपन करीत नसल्यामुळे येथे राजकीय खिचडी हण्याची शक्यता आहे. तशी शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

 महाविकास आघाडी
राष्ट्रवादी काॅंग्रेसने मांडला महाविकास आघाडी सरकारचा लेखाजोखा; पाहा व्हिडिओ

निवडणुकीत महाविकास आघाडी होऊन जनतेच्या हिताच पॅनल उभे राहील, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. सन्मानाने अपेक्षित जागा न मिळाल्यास फरफटत न जाता स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्धार काँग्रेसने केला आहे. त्याची रंगीत तालीम उद्या ठेवलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीतून होणार आहे. भाजपला शहरात चेहराच नाही. माजी मंत्री राम शिंदे यांना खासदार डॉ. सुजय विखे पाटील व त्यांच्या समर्थकांना सोबत घेत एकट्याने खिंड लढवावी लागेल.

विखे समर्थक जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ हे भाजपने घेतलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीसाठी अनुपस्थित होते. याचे कारण अद्यापि गुलदस्त्यातच असल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत. कर्जतमध्ये सोय आणि सेटलमेंट हा कळीचा मुद्दा आहे. विविध पक्षांच्या नेतृत्वाला अथवा प्रमुखाला प्रत्येक प्रभागातील उमेदवार निश्चित करताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

 महाविकास आघाडी
आमदार रोहित पवारांनी एकाच बाणात केले अनेक पक्षी घायाळ...

गेल्या नगरपंचायत निवडणुकीत भोपळाही फोडू न शकलेली राष्ट्रवादी सध्या प्लसमध्ये आहे. आमदार पवार यांनी भाजपला खिंडार पाडीत अनेक मोहरे गळाला लावित जोरदार इन्कमिंग करून घेतले. प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत आणि नगरसेविका उषा राऊत यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. विकासकामांच्या माध्यमातून रोहित पवार यांनी पक्षासाठी फिलगुड वातावरण केले आहे.

नगराध्यक्ष राऊत, प्रसाद ढोकरीकर यांच्यासह निवडणुकीतील अनेक सक्रिय नेते राष्ट्रवादीत गेले आहेत. भाजपला नक्कीच त्यांची उणीव जाणवेल. काँग्रेसने गत निवडणुकीत विरोधी पक्षात असतानादेखील चार जागा जिंकून अस्तित्व टिकवून ठेवले होते. सचिन घुले, मोनाली तोटे, पूजा म्हेत्रे, डॉ. संदीप बरबडे तसेच प्रथम महिला नगराध्यक्षा प्रतिभा भैलूमे या काँग्रेसच्या मदतीवर अपक्ष म्हणून विजयी झाल्या होत्या. नंतर त्यांनी व डॉ. बरबडे यांनी हाती कमळ घेतले.

 महाविकास आघाडी
श्रीगोंदे, कर्जतच्या जागेसाठी कॉंग्रेसच्या साळुंके, नागवडे ठाम

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले काय भूमिका घेतात, हे औत्सुक्याचे ठरेल. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, जिल्हाध्यक्ष राजेंद्र दळवी आणि तालुकाध्यक्ष बळीराम यादव यांच्यावर शिवसेनेची मदार आहे. महाविकास आघाडी होणार की खिचडी तसेच भाजपला बंडखोरी डोकेदुखी ठरणार, असेच सध्या वातावरण आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com