त्या नेत्याने आपल्या एकुलत्या एक मरणासन्न मुलाचे ऑक्सिजन काढून घेतले

भारतीय स्वातंत्र्यापूर्वीच्या नेत्यांचे राजकारण हे सध्याच्या राजकारणापेक्षा खूप वेगळे होते.
K. B. Deshmukh
K. B. DeshmukhSarkarnama

अहमदनगर - भारतीय स्वातंत्र्यापूर्वीच्या नेत्यांचे राजकारण हे सध्याच्या राजकारणापेक्षा खूप वेगळे होते. इंग्रजांच्या काळात मुंबई प्रांताच्या विधानसभेचे आमदार असलेल्या एका नेत्याने आपल्या मरणासन्न एकुलत्या एक मुलाचे ऑक्सिजन काढून घेण्याचे धारिष्ठ्य दाखविले. एवढेच काय ज्याच्यामुळे मुलाचा अपघात घडला त्याचे सांत्वनही केले. ( The leader took away the oxygen of his only dying child )

हा प्रसंग आहे इंग्रज काळातला. 1936 च्या सुमारास काँग्रेसने पहिल्यांदा देशात निवडणूक लढविण्याचे ठरविले. त्यानंतर काँग्रेसने जिल्हा लोकल बोर्ड, विधानसभा, लोकसभेत आपले प्रतिनिधी पाठविले. अशाच अहमदनगर जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष राहिले व संगमनेर, अकोलेतून विधानसभेवर गेले आमदार अॅड. केशवराव बळवंतराव देशमुख (के.बी. देशमुख) यांच्या जीवनातील हा एक प्रसंग.

K. B. Deshmukh
विजय औटी यांच्या राजकीय कारकिर्दीला लंकेंकडून कायमचा ब्रेक?

के. बी. देशमुख यांना सर्वजण के.बी. दादा म्हणून ओळखत. ते माजी मंत्री बी.जे. खताळ पाटील यांचे सासरे. 1930 ते 34 या कालावधीत अकोले तालुक्यात इंग्रजांविरूद्ध जंगल सत्याग्रह झाला होता. यातील आरोपींच्या वतीने के.बी. देशमुख यांनीच युक्तीवाद केला होता. अकोले व संगमनेर तालुक्यात बहुजन मुलांना शिक्षणाची दारे खुली करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

त्यांच्याजवळ एक मोटारगाडी होती. ही मोटारगाडी ते कधीकधी त्यांच्या वकील सहकाऱ्याला चालवायला देत. एकदा के.बी. दादांचे वकील सहकारी मोटारगाडी चालवत असताना त्यांच्या मोटारी खाली एक मुलगा सापडला. त्यांनी गाडी कशीबशी उभी केली. आणि पाहतात तर काय रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला मुलगा हा के.बी. देशमुख यांचाच होता. ही घटना के.बी. देशमुख यांना समजली. त्यांनी मुलाला उपचारासाठी पुण्याला हलविले. ज्या सहकाऱ्याकडून अपघात झाला. त्याचे सांत्वन केले. त्यांना धीर दिला. एका अशिलाची अत्यंत महत्त्वाची केस असल्याने दिल्लीला निघून गेले.

K. B. Deshmukh
पवार-विखे वादाला तरूणाई मैत्रीत बदलू पाहतेय...

ते काम अटोपून ते दिल्लीहून लगवगीने आल्यानंतर त्यांनी मुलाची अवस्था पाहिली. ऑक्सिजनवर ठेवलेला त्यांचा एकुलता एक मुलगा. त्यांच्या नाका तोंडात नळ्या. जगण्यासाठी त्याचा चाललेला संघर्ष. त्यांची ही अवस्था पाहून के.बी. देशमुखांनी काळजावर दगड ठेवत त्यांच्या नाका तोंडातील नळ्या स्वतःच्या होताने काढल्या. त्या क्षणी त्याने प्राण सोडला. ते डॉक्टरांना जड अंतकरणाने म्हणाले, त्याला वाचविण्याची तुम्ही शिकस्त केली. तो वाचू शकला नाही. आता माझ्यासाठी त्याला मी अधिक यातना देऊ इच्छित नाही, असे त्यांनी जड आवाजात सांगितले.

बी.जे. खताळ पाटील यांनी के.बी. देशमुख यांच्या 'स्मृती'त या प्रसंगा विषयी सांगितले आहे की, "त्यानंतर ती गाडी दादांनी ( के.बी. देशमुख ) कधी वापरली नाही."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com