
Satara Udayanraje Bhosale News : पुसेसावळीतील घटना दुर्दैवी असून, या घटनेने मला मनापासून दु:ख झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. पण, स्वत:च्या स्वार्थापोटी कोण काही करत असेल तर ते योग्य नाही. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे आणि हा संदेश जगात गेला पाहिजे, सर्वांनी शांततेत राहावे, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
पुसेसावळी (ता. खटाव) येथे रात्री महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याबद्दल जाळपोळीची घटना घडली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर खटाव तालुक्यात तणावपूर्ण शांतता आहे. खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांनी हिंदू व मुस्लिम Hindu-muslim समाजाला शांततेचे आवाहन केले आहे.
उदयनराजे म्हणाले, पुसेसावळीतील घटनेचे मनापासून दु:ख वाटते. ही घटना दुर्दैवी असून, स्वत:च्या स्वार्थापोटी कोण काही करत असेल तर ते योग्य नाही. मी त्यांच्या एवढा मोठा नाही पण छोटाही नाही. आपल्या सगळ्यांचे रक्त सारखेच आहे. त्या काळापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला. पण आज प्रत्येक लोकांनी जातीचा फायदा घेतला.
मी व्यक्तीकेंद्रित नाही. पण, आज जी पेटवापेटवी झाली ती यातूनच झाली आहे. हिंदू, मुस्लिम समाज यांना कुठं पाठविणार, असा प्रश्न करून आपण जन्माला इथं आलेलो आहे. त्यामुळे जाणार कुठे, स्मशानात. शेवटी सर्वजण तिथेच जातात. पण नीट वागले पाहिजे.
आपल्याला लाज वाटली पाहिजे बंधू भावाच्या भावनेतून प्रत्येकाने एकत्र राहिले पाहिजे. ज्यांची हत्या झाली त्यांच्या कुटुंबाला कोण भरुन देणार, आयुष्य एकदाच येते. त्यांच्या कुटुंबाची पैशाने भरपाई होऊ शकत नाही. त्यामुळे आपण एकत्र राहिले पाहिजे. जगात हाच संदेश गेला पाहिजे. सर्व शांततेत राहू द्या, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
Edited By Umesh Bambare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.