Maharashtra Budget Session: राज्यात 'अवकाळी'चा हाहाकार; सभागृहात विरोधक गरजणार!

Ahmednagar News: राज्यातील उभी पिके संकटात; शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Ajit Pawar: राज्यात दीड महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकरी (Onion) अडचणीत आहे. बाजारभाव घसल्याने कांदा उत्पदाक शेतकऱ्यांना अत्यंत कमी उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघत नसल्याचे चित्र राज्यात दिसून येत आहे. तसेच कापूस, हरभरा, द्राक्ष उत्पादक शेतकरीही अडचणीत आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्यात अवकाळी पाऊस पडला. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

अवकाळी पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी सभागृहात करणार असल्याची ग्वाही विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. ते पाथर्डी (अहमदनगर) येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, "अवकाळी पावसामुळे निफाड तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. सध्या गव्हाची पिके काढणीला आली आहेत. द्राक्ष तोडणीचा हंगाम सुरू आहे. ती बाजारात पाठवायची आहेत. हरभरा, कापूस, कांदा ही पिके अडचणीत आली आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत उद्या सभागृहात आवाज उठविणार आहे. तसेच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी सरकारकडे मागणी करणार आहे."

शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सराकर कायम लक्ष ठेवून आले. त्यांना योग्य ती मदत करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. फडणवीस म्हणाले, "राज्यात अवकाळी पाऊस झाला ही चिंतेची बाब आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. राज्यात अवकाळी पाऊस कमी ठिकाणी पडला असला तरी त्याचे नुकसान मात्र मोठे आहे. हे सरकार कायम शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे कायम लक्ष आहे. त्यांची मदत करण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील."

राज्यातील पुणे, मुंबईसह अनेक भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गारपीटही झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी फटका बसलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या शेताचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in