Karad : पालकमंत्र्यांनी पदाचा उपयोग कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्यात केला... जयकुमार गोरे

आमदार गोरे Jaykumar Gore म्हणाले, पंतप्रधान Prime Minister नरेंद्र मोदीजींच्या Narendra Modi नेतृत्वाखाली देशात विकासाचे काम जोमाने चालू आहे.
Balasaheb Patil, Jaykumar Gore
Balasaheb Patil, Jaykumar Goresarkarnama

औंध : कराड उत्तरच्या आमदाराला सहकार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले पण, पदाचा उपयोग विरोधातील कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्यात व त्यांच्यावर पोलिस केसेस करण्यात केला. आता वेळ बदलली आहे, कार्यकर्त्यांनी चिंता करण्याची गरज नाही, असे मत भाजपाचे जिल्हाध्यक्ष, आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसांपासून सुरू झालेल्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा संवाद यात्रेदरम्यान कराड उत्तरमधील मेळाव्यात ते बोलत होते. आमदार गोरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशात विकासाचे काम जोमाने चालू आहे. कोरोना काळात जहरी टीका करणारे विरोधक असतानाही देशात लसीकरण मोहीम यशस्वी करून करोडो लोकांचे प्राण वाचवले.

Balasaheb Patil, Jaykumar Gore
नरेंद्र मोदींनी लाँच केली लॉजिस्टिक पॉलिसी : 'विकसित भारताच्या दिशेने मोठे पाऊल'

मोदींमुळे काश्मिरमध्ये तिरंगा ध्वज फडकत आहे. ३७० कलम रद्द करून तेथील लोकांना न्याय दिला. वारकरी संप्रदयाच्या दृष्टीने महत्वाचा १२०० कोटींचा पालखी मार्ग मोदीजींनी उभारला आहे. त्याचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. गावागावात लोकांना घरे मिळावी यासाठी प्रत्येक कुटुंबाला घर देण्यासाठी ग्राउंड लेव्हलवर काम करत करोडो कुटुंबांना मोदींच्या कार्यकाळात घरे मिळाली.

Balasaheb Patil, Jaykumar Gore
Jaykumar Gore|राष्ट्रवादीत बारामती, फलटणकरांची घराणेशाही... जयकुमार गोरेंचा टोला

केंद्राच्या मदतीने गावोगावी ३०-३२ कोटींचा निधी मिळू लागला आहे. रशिया युक्रेन युद्धात भारताची ताकद जगाला समजली. भारतीय नौदलात छत्रपती शिवरायांना सन्मान देण्याचे ऐतिहासिक कार्य मोदींनी केले. कराड उत्तरच्या आमदाराला सहकार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले. पण, या पदाचा उपयोग विरोधातील कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्यात व त्यांच्यावर पोलिस केसेस करण्यात केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com