शिर्डी विमानतळाला ग्रामपंचायत लावणार कुलूप

शिर्डी विमानतळ हे काकडी ग्रामपंचायत हद्दीत तयार करण्यात आले आहे.
shirdi airport
shirdi airportsarkarnama

अहमदनगर - शिर्डी विमानतळ हे काकडी ग्रामपंचायत हद्दीत तयार करण्यात आले आहे. या विमानतळाच्या भूसंपादनापासून हे विमानतळ वादाचा विषय ठरत आले आहे. आता शिर्डी विमानतळ थकीत कर वेळेत देत नसल्याने काकडी ग्रामपंचायतीने आक्रमक भूमिका घेतली आहे. ( The Gram Panchayat will lock Shirdi Airport )

2006 साली काकडीत विमानतळासाठी 1500 एकर भूसंपादन झाले. 2017मध्ये काकडी ( ता. कोपरगाव ) येथे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने विमानसेवा सुरू केली. शिर्डी विमानतळ प्रधिकरणाकडे कराचे पाच ते साडेपाच कोटी रुपये थकीत आहेत. त्यामुळे या विमानतळाला टाळे ठोकण्याचा इशारा काकडी ग्रामस्थांनी दिला आहे. कर थकल्याने गावच्या विकास प्रक्रियेवर परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. मागील चार वर्षांत विमानतळ प्रधिकरणाने कर भरलेला नाही.

shirdi airport
शिर्डी विमानतळ प्रश्नावर सुजय विखेंच्या प्रयत्नाला यश

मागील विधानसभा अधिवेशनात राज्य सरकारने शिर्डी विमानतळासाठी 150 कोटींचा निधी मंजूर केला आहे. आगामी 15 दिवसांत थकीत कर भरण्यात आला नाही तर विमानतळाला टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

काकडीच्या सरपंच पूर्वा गुंजाळ म्हणाल्या, विमान प्राधिकरणाने काकडी ग्रामपंचायतला एकही रुपया कर दिलेला नाही. विमान प्राधिकरणाने ज्यावेळी भूसंपादन केले त्या वेळी काकडी गावात रस्ते, पाणी, शाळा आदी सर्वसुविधा देण्याचे कबूल केले होते. मात्र आमच्या गावात अजूनही शाळा नाही. पथदिवे नाहीत. कोणतीही सुविधा नाही. त्यांनी सुविधा दिल्या नाहीच शिवाय करही थकीत ठेवला आहे. या पूर्वी बऱ्याच वेळा विमान प्राधिकरणाला नोटिसा दिल्या आहेत. 15 दिवसांत कर न दिल्यास शिर्डी विमानतळाला टाळे लावू.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com