सरकारचा रिमोट कंन्‍ट्रोलही आता दुसऱ्यांच्‍या ताब्‍यात गेल्‍याने मुख्‍यमंत्री हतबल

भाजपचे ( BJP ) ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( MLA Radhakrushna vikhe Patil ) यांनी राज्यातील महाविकास आघाडीतील ( Mahavikas Aghadi ) मंत्र्यांसंदर्भात गौप्यस्फोट केला आहे.
सरकारचा रिमोट कंन्‍ट्रोलही आता दुसऱ्यांच्‍या ताब्‍यात गेल्‍याने मुख्‍यमंत्री हतबल
radhakrishna vikhe patilSarkarnama

लोणी ( अहमदनगर ) : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर भाजपकडून आर्थिक घोटाळ्याचे आरोप होत आहेत. तसेच काही मंत्री व त्यांच्या कुटूंबीयांची आयकर विभाग, ईडी आदी संस्थांकडून चौकशी होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडीतील मंत्र्यांसंदर्भात गौप्यस्फोट केला आहे. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्‍याच्‍या बॉयलर अग्निप्रदिपन सोहळ्यानंतर आमदार विखे पाटील यांनी माध्‍यमांशी संवाद साधला. The government's remote control is now in the hands of others, so the Chief Minister is helpless.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, आयकर विभागाने 1 हजार 50 कोटी रुपयांच्‍या समोर आणलेल्‍या घोटाळ्यात राज्यासह जिल्ह्य़ातील ‘कोणाला लक्ष्‍मी प्रसन्‍न झाली आणि कोणाचे हात सोन्‍याने पिवळे झाले’ हे लवकरच समोर येईल असे सूचक विधान करुन महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. भ्रष्‍टाचाराने बरबटलेल्‍या या सरकारचा रिमोट कंन्‍ट्रोलही आता दुसऱ्यांच्‍या ताब्‍यात गेल्‍याने मुख्‍यमंत्री हतबल झाल्‍याची घणाघाती टिका त्‍यांनी केली.

radhakrishna vikhe patil
विकासकामात राजकारण आडवे येवू दिले नाही ः आमदार राधाकृष्ण विखे पाटील

आमदार विखे पाटील पुढे म्हणाले, सत्‍तेवर आल्‍यापासुनच महाविकास आघाडी सरकार भ्रष्‍टाचाराच्‍या विळख्‍यात अडकत चालले आहे. या घोटाळ्यांवरुन जनतेचे लक्ष विचलित करुन, केवळ दिशाभुल करण्‍याचे काम मंत्र्याकडून सुरु असून, कालचा महाविकास आघाडीचा बंद हा त्‍याचसाठी होता. परंतु राज्‍यातील सुज्ञ जनतेने या महाराष्ट्र बंदला कोणताही प्रतिसाद दिला नसल्‍याचा दावा त्‍यांनी केला.

radhakrishna vikhe patil
"माझा जीव, माझी जबाबदारी' म्हणण्याची वेळ!  राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका

मागील आठवड्यात आयकर विभागाने समोर आणलेल्‍या घोटाळ्यात आधिकारी, दलाल आणि काही मंत्र्यांची नावे असल्‍याची आपली माहीती आहे. त्‍यामुळे या घोटाळ्यात कोणाला लक्ष्‍मी प्रसन्‍न झाली आणि कोणाचे हात सोन्‍याने पिवळे झाले हे समोर येईलच परंतु हे रॅकेट उघड झाल्‍यास जिल्‍ह्यातील काहींची नावे पुढे आली तर आश्‍चर्य वाटायचे कारण नाही. महाविकास आघाडी सरकारच्‍या कार्यकाळात भ्रष्‍टाचाराची मालिकाच समोर आली आहे. राज्‍याच्‍या इतिहासात गृहमंत्री फरार झाल्‍याची घटना प्रथमच घडली आहे. यावरूनच या सरकारचा कारभार जनतेच्‍या हिताचा आता राहिला नसल्‍याची टिका आमदार विखे पाटील यांनी केली.

radhakrishna vikhe patil
महाआघाडी फक्त अधिकाऱ्यांच्या बदल्यांत व्यस्त : खासदार डॉ. सुजय विखे पाटील

उत्‍तर प्रदेशमध्‍ये घडलेल्‍या घटनेचे समर्थन नाहीच परंतु या घटनेतील वास्‍तविकता चौकशीतून समोर येईलच. या घटनेचे भांडवल करुन, महाराष्‍ट्र बंद करण्‍याचा महाविकास आघाडीचा खटाटोप हा नाकर्तेपणा दाखविणारा ठरला आहे. केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे संसदेत मंजूर होत असताना महाविकास आघाडीचे मार्गदर्शक मात्र त्‍यावेळी सभागृहात काही बोलले नाहीत, शिवसेनेच्‍या खासदारांनी सोईनुसार गप्‍प बसण्‍याची भूमिका घेतली. आता फक्‍त राजकारणासाठी आपली पोळी भाजून घेण्‍याचे महाविकास आघाडी सरकारचे प्रयत्‍न जनतेच्‍याही लक्षात आले आहेत. त्‍यामुळेच मुख्‍यमंत्री हतबल झाल्‍याचे चित्र पाहायला मिळत असल्‍याचा टोला त्‍यांनी लगावला.

Related Stories

No stories found.