Satara : प्रतापगडावर सरकार उभारणार अफझल खान वधाचे शिल्प....

छत्रपती शिवरायांनी chhatrapati Shivaji Maharaj अफझल खानाचा Afzal Khan कोथळाबाहेर काढून त्याचा वध केला, हा पुतळा तेथे उभारावा आणि या घटनेवरील लाईट साउंड शो light sound Show तेथे सुरू करावा, अशी विनंती सातारा हिंदू एकता आंदोलन Hindu ekta Andolan व अन्य संघटनांनी सरकारकडे केली आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj and Afzal Khan
Chhatrapati Shivaji Maharaj and Afzal Khansarkarnama

मुंबई : छत्रपती शिवरायांनी अफझल खानाचा कोथळा बाहेर काढून त्याचा वध केल्याचे शिल्प प्रतापगडावर उभारण्याबाबत तसेच या घटनेचा लाईट साउंड शो तेथे सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मागवावा, असे आदेश पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पर्यटन सचिवांना दिला आहे.

नुकतीच राज्य सरकारने प्रतापगडावरील अफझल खानाच्या कबरीशेजारील अतिक्रमणे काढून ती कबर पूर्ववत केली होती. कबरीच्या व अफझल खानाच्या उदात्तीकरणाचे प्रयत्नही सरकारने हाणून पडल्याचे या घटनेतून दिसते असे सांगण्यात आले होते.

राज्यात २००० नंतर पंधरा वर्षे काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना अनेक गणेशोत्सव मंडळांना अफझल खान वधाचे देखावे लावण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. या देखाव्यांवरून काही ठिकाणी जातीय दंगल झाली होती. तर आता प्रतापगडावर शिवछत्रपतींच्या शौर्याचे प्रतीक म्हणून अफझल खान वधाचा देखावा उभारण्यात यावा, अशी मागणी पुढे आली आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj and Afzal Khan
अफझल खान कबर परिसर पर्यटकांसाठी खुला करा : माजी आमदार नितीन शिंदे

शिवरायांनी अफझल खानाचा कोथळाबाहेर काढून त्याचा वध केला, हा पुतळा तेथे उभारावा आणि या घटनेवरील लाईट साउंड शो तेथे सुरू करावा, अशी विनंती सातारा हिंदू एकता आंदोलन व अन्य संघटनांनी सरकारकडे केली आहे. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मागवावा, असे आदेश पर्यटन मंत्री लोढा यांनी पर्यटन सचिवांना दिला आहे. त्यामुळे लवकरच या मागणीची पूर्तता होईल, असेही सांगितले जात आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj and Afzal Khan
Wai : प्रतापगड उत्सव समितीच्या २५ वर्षांच्या लढ्याला यश; पेढे वाटून आनंदोत्सव...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in