सरकार येते जाते कोणी ताम्रपट घेऊन आला नाही : अजित दादांनी पिचड समर्थकांना सुनावले

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी पिचड समर्थकांना सुनावले.
Ajit pawar Latest Marathi News, NCP News, Political News
Ajit pawar Latest Marathi News, NCP News, Political NewsSarkarnama

अहमदनगर - अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पिचड पिता-पुत्रांना महाविकास आघाडीने आव्हान देत पॅनल उभा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांंच्या पतसंस्थांची चौकशी करावी या मागणीचे पत्र पिचड समर्थकांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले. या पत्राची प्रतच पॅनलच्या प्रचारसभेत मतदारांना दाखवत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी पिचड समर्थकांना सुनावले. ( The government comes and goes, no one came with copper foil: Ajit Dada told the supporters of Pichad )

अजित पवार म्हणाले, केंद्रात व राज्यात माझे सरकार आहे म्हणजे मी काहीही करायचे काय? सरकार येते-जाते कोणी ताम्रपट घेऊन आलेला नाही. राज्यात कायदा, तपास यंत्रणा आहेत. दोषी वाटत असेल तर तपास यंत्रणा चौकशी करतील. दोषी असेल तर कारवाई होईल. आम्ही सत्तेत असताना राज्यात कोणावर चौकशी लावली नाही अथवा कारवाई केली नाही. कारभार चुकीचा असेल तर सभासद निर्णय घेतील. संचालक मंडळ हे विश्वस्त आहे. सभासद शेतकरी हे साखर कारखान्याचे मालक आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Ajit pawar Latest Marathi News, NCP News, Political News
सरकारने केलेली पेट्रोल-डिझेलची दरकपात अत्यंत तोकडी; सामान्यांना फायदा नाही : अजित पवार

ते पुढे म्हणाले की, सरकार येत-जात असते. हे राज्य सरकार कधी, किती दिवस चालेल सांगता येत नाही. राज्यात केवळ दोन जण सरकार चालवत आहेत. राज्यात पूर, वादळ, अतिवृष्टीचे नैसर्गिक संकट आले आहे. अशा स्थितीत मंत्रीमंडळ विस्तार करायला हवा. पालकमंत्री नेमून जिल्ह्यात प्रशासकीय नियोजन करायला हवे. मात्र तसे होताना दिसत नाही. असे कसे चालेल. हे सरकार राज्यातील जनतेला नैसर्गिक संकटात मदत करत नसेल तर काय उपयोग?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Ajit pawar Latest Marathi News, NCP News, Political News
अजित पवार म्हणतायेत; घोड कुठं पेंड खातयं, मंत्रीमंडळाचा विस्तार का होत नाही ?

कुणी चुकले तर माझ्याशी गाठ

शेतकरी समृद्धी मंडळाच्या पॅनलमध्ये नव्या जुन्याचे मिश्रण आहे. केवळ नवीन अथवा केवळ जुने संचालक चालत नाहीत. या पॅनलने सत्ता आल्यावर समन्वयाने काम करावे. कोणी चुकला तर माझ्याशी गाठ आहे. घरात भांड्याला भांडे लागते. अशा स्थितीत मी चर्चा करून निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com