बाळासाहेब मुरकुटेंच्या गावातील सोसायटीवर गडाख गटाची सत्ता

मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) व भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे ( Balasaheb Murkute ) यांच्यात सत्ता संघर्ष आहे.
Gadakh group
Gadakh groupSarkarnama

सोनई ( जि. अहमदनगर ) - नेवासे तालुक्यात राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) व भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे ( Balasaheb Murkute ) यांच्यात सत्ता संघर्ष आहे. देवगाव हे बाळासाहेब मुरकुटे यांचे गाव. या गावातील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक आज झाली. या निवडणुकीत गडाख गटाने सर्व जागा जिंकत मुरकुटेंना मोठा धक्का दिला. ( The Gadakh group rules over the society in the village of Balasaheb Murkute )

मंत्री शंकरराव गडाख यांचे कट्टर विरोधक व माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या देवगाव येथील सेवा संस्थेच्या निवडणुकीत आज गडाख गटाचा झेंडा फडकला आहे. सर्व तेरा जागेवर बॅट चिन्हाने विजयाचे चौकार, षटकार लगावले.

Gadakh group
मुरकुटेंच्या सासरवाडीत गडाख गटाचा विजय

देवगाव (ता. नेवासे) येथील ग्रामपंचायत व सेवा संस्थेत माजी आमदार मुरकुटे सत्ता होती. ग्रामपंचायतीचे उपसरपंच व काही सदस्यांनी हातात शिवबंधन बांधून गडाखांचे नेतृत्व मान्य केले. मुरकुटे यांचे पुतणे व पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे यांनी सुध्दा शिवसेनेत प्रवेश केला होता. याच दे धक्कामुळे मुरकुटे गटाने सेवा संस्था निवडणुकीत काढता पाय घेतला होता.

आज दहा जागेसाठी झालेल्या निवडणुकीत सर्व जागा मंत्री गडाख गटाने जिंकल्या आहेत. अगोदर तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या. विजयानंतर गावात पाऊस पडत असताना सुध्दा कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. 'शिवसेना जिंदाबाद' व 'मंत्री गडाखांचा विजय असो'च्या घोषणा देण्यात आल्या.

Gadakh group
यशवंतराव गडाखांनी संकटाला कसे नमवले.... शंकरराव गडाख यांनी सांगितला अनुभव

विजयी उमेदवार

बाबानाथ आगळे, गोरक्षनाथ निकम, ज्ञानदेव निकम, बाबासाहेब पाडळे, कुंदनमल भंडारी, शिवाजी मोरे, नूरमहंमद शेख, सुभाष निकम, पार्वती ठोंबरे, शारदा शिंदे हे विजयी झाले तर बिनविरोध संचालकांत कैलास रोडगे, सखाहरी गायकवाड व मच्छिंद्र काळे यांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com