उड्डाणपुलाच्या कामातील क्रेन युवकाच्या अंगावर कोसळली आणि...

अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.
Flyover in Ahmednagar
Flyover in AhmednagarSarkarnama

अहमदनगर - अहमदनगर शहरात सक्कर चौक ते अशोक हॉटेल असा उड्डाणपूल तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे. काल ( शुक्रवारी ) दुपारी कोठी चौकात उड्डाणपुला खाली काम करत असलेली क्रेन अचानक कोसळली. त्या वेळी या क्रेन जवळून एक युवक जात होता. त्याच्या अंगावर ही क्रेन कोसळली आणि असा काही घटनाक्रम घडला की या युवकाचा जीव वाचला. ( The flyover crane fell on the young man and ... )

अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. हे काम करताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून काळजी घेण्यात येत आहे. हे काम रात्रीच्या वेळी चालत दिवसा फक्त डागडुजीची व किरकोळ कामे केली जातात. रात्रीच्या वेळी उड्डाणपुला खालील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाते. त्यामुळे माळीवाडा बसस्थानकही रात्रीच्या वेळी बंद ठेवण्यात येते.

Flyover in Ahmednagar
होळी आधीच नगर महापालिकेत आयुक्त, उपायुक्तांच्या नावाने शिमगा

काल दिवसा काही डागडुजीचे काम सुरू होते. त्यासाठी उड्डाणपुलाच्या खाली क्रेन उभी होती. ही क्रेन अचानक कोसळली. त्याच दरम्यान एक युवक उड्डाणपुला खालून जात होता. त्याच्या अंगावर क्रेन कोसळू लागली. तो पळण्याचा प्रयत्न करत असतानच क्रेन कोसळली. क्रेन व उड्डाणपुलाचा खांब यांमध्ये हा युवक अडकला.

Flyover in Ahmednagar
त्या नेत्याने आपल्या एकुलत्या एक मरणासन्न मुलाचे ऑक्सिजन काढून घेतले

ही घटना पाहणारे नागरिक व राष्ट्रीय महामार्गाचे काम करणारे कर्मचारी धावत युवकाजवळ आले. काही लोकांनी क्रेन हलविण्याचा प्रयत्न केला मात्र क्रेन जड असल्याने जेसीबीचा वापर करण्याचा प्रयत्नही झाला तो पर्यंत युवक वेदनेने ओरडत होता. नागरिकांना वाचविण्यासाठी याचना करत होता. अखेर सर्वांनी प्रयत्न करून त्याला बाहेर काढले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com