नगर जिल्ह्यात येथे होणार महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल

राज्यातील पहिला काचेचा पूल तयार करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP ) एका आमदाराने 5 कोटी रूपये मंजूर करून आणले आहेत.
glass bridge
glass bridgeSarkarnama

अहमदनगर - विदेशा प्रमाणे भारतात सहा ठिकाणी काचेचे पूल आहेत. मात्र महाराष्ट्रात काचेचा पूल नाही. महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल तयार करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP ) एका आमदाराने राज्याच्या अर्थसंकल्पातून 5 कोटी रूपये मंजूर करून आणला आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात पर्यटनाला आणखी चालना मिळणार आहे. ( The first glass bridge in Maharashtra will be built in Nagar district )

देशातील सातवा व महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल रंधा धबधबा येथे होणार आहे. त्यासाठी पाच कोटी रुपये अर्थ संकल्पत मंजूर झाले आहेत. त्यापैकी अडीच कोटीचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ.किरण लहामटे ( Kiran Lahamte ) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

glass bridge
डॉ. किरण लहामटे म्हणाले, सत्ता द्या विकास पहा...

आमदार लहामटे पुढे म्हणाले की, अकोले तालुक्यातील पर्यटन विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. अकोले तालुक्यात रंधा धबधबा येथे लवकरच काचेचा पूल तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी 5 कोटी पैकी 2 कोटी 50 लाख रुपयांचा निधी नुकताच प्राप्त झालेला आहे. आजपर्यंत अकोले तालुक्यात भरपूर निधी आणला असून यापुढे ही तो आणला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

रंधा धबधबा येथे होणारा काचेचा पूल हा महाराष्टातील पहिला पूल असून देशातील 6 वा पूल आहे. घाटनदेवी चौंढ घाटसाठी प्रयत्न सुरू असून लवकरच त्या बाबत ही निर्णय होईल तसेच शहापूर चौंढ रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी होणार आहे. कळसुबाई येथे रोप वे महत्वाचा असून त्या बाबत स्थानिक ठिकाणी गैरसमज निर्माण करून देत आहे. मात्र या लोकांसोबत मी बोललो असून त्या बाबत ही निर्णय होईल.

glass bridge
डाॅ. लहामटे का म्हणाले, मी पळकुटा आमदार नाही

आजपर्यंत अहमदनगर जिल्ह्यात नंबर एकचा निधी फक्त अकोले तालुक्यात आणला असून पुढारी जरी माझ्यावर नाराज असतील मात्र तालुक्यातील जनता खुश आहे. उपजिल्हा रुग्णालयासाठी जुलैपर्यंत 45 लाख रुपयांचा निधी येणार आहे. अकोले नगरपंचायतला 5 कोटीचा निधी देण्यात आला असून प्रवरा नदीचे ही सुशोभीकरण करण्यात येणार आहे. निळवंडेच्या उजव्या कालव्याचे पाणी ऑक्टोबरमध्ये देण्याचा मानस आहे. हा तालुका ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आवडता तालुका असून निधी कमी पडणार नाही. पिंपरकणे पुलाचे काम 2023-24पर्यंत निश्चित पूर्ण होईल असे आमदार लहामटे यांनी सांगितले.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भानुदास तिकांडे, जिल्हा बँकचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर, अगस्तीचे संचालक अशोक देशमुख, युवा नेते विकास शेटे, रवींद्र मालूनजकर, अंकुश वैद्य, सचिन पवार, डॉ. अविनाश कानवडे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com