नगर जिल्ह्यातील 12 बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगूल वाजला
Pudhari.jpgSarkarnama

नगर जिल्ह्यातील 12 बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगूल वाजला

कोरोनाचा ( Corona ) प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे महाराष्ट्र सरकारने ( Government of Maharashtra ) सहकारातील विविध संस्थांच्या निवडणुका ( Elections ) घेण्याचा निर्णय घेतला आहे.

अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य सरकारने सहकारातील विविध संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही घोषणा मागील आठवड्यात झाली होती. त्यानुसार आता राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांचा संभाव्य कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार 17 जानेवारी 2022 रोजी मतदान होणार आहे. The election of 12 market committees in Nagar district was trumpeted

कोरोना विषाणूमुळे सहकार विभागातील विविध संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सहकारातील विविध संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश राज्य सरकारने जारी केलेला आहे. त्यानुसार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रम हाती घेतला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी संभाव्य निवडणूक कार्यक्रम जारी केला आहे. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे.

Pudhari.jpg
'जिल्हा परिषद, बाजार समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केलेले हे बिनबुडाचे आरोप'

अहमदनगर जिल्ह्यात 14 तालुक्यांत बाजार समित्या आहेत. त्यातील पारनेर व नगर तालुका बाजार समिती वगळता सर्व तालुक्यांतील बाजार समित्यांचा संभाव्य निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे राजकीय तयारीला वेग आला आहे. या निवडणुकांनंतर विधान परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्था आदी निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राजकीय हलचालींना वेग आला आहे.

Pudhari.jpg
देविदास पिंगळे यशस्वी; बाजार समिती निवडणुकीचा मार्ग खुला

संभाव्य कार्यक्रम असा

10 नोव्हेंबर : प्रारूप यादी प्रसिद्ध करणे

10 ते 22 नोव्हेंबर : प्रारूप यादीवर हरकती व आक्षेप मागवणे

22 नोव्हेंबर ते एक डिसेंबर : प्राप्त हरकती व आक्षेपांवर निर्णय

सहा डिसेंबर : मतदार यादी अंतिम करणे

16 डिसेंबर : निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करणे

16 ते 22 डिसेंबर : उमेदवारी अर्ज विक्री, स्वीकृती व प्रसिद्धी

23 डिसेंबर : अर्जांची छाननी

24 डिसेंबर : अर्जांची प्रसिद्धी

24 डिसेंबर 2021 ते सात जानेवारी 2022 : अर्जमाघारी

दहा जानेवारी : निवडणूक चिन्हांसह अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध करणे

17 जानेवारी : मतदान

18 जानेवारी : मतमोजणी

हा संभाव्य निवडणूक कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे. त्यात बदल होऊ शकतो.

- दिग्विजय आहेर, जिल्हा उपनिबंधक

Related Stories

No stories found.