सातारचे जिल्हाधिकारी म्हणतात, अतिवृष्टीग्रस्तांच्या भरपाईसाठी 827 कोटी द्या
Central Committee koyana visitcollector office

सातारचे जिल्हाधिकारी म्हणतात, अतिवृष्टीग्रस्तांच्या भरपाईसाठी 827 कोटी द्या

केंद्रीय पथकाने कोयना विभागातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरपरस्थितीमधील नुकसानीची पाहणी आज केली.

कोयनानगर : जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे मोठयाप्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. जिल्ह्यात झालेल्या या नुकसानीच्या भरपाईसाठी केंद्राकडून 827.33 कोंटी रुपयाचा निधी तातडीने मिळावा, अशी मागणी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज केंद्रीय पथकाकडे केली.

केंद्रीय पथकाने कोयना विभागातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरपरस्थितीमधील नुकसानीची पाहणी आज केली. कोयनानगर येथील मराठी शाळेत दोन महिन्यापासुन स्थलांतरीत केलेले मिरगाव गावाच्या आपत्तीग्रस्तांची भेट घेवुन त्यांची विचारपुस केली. त्यानंतर मिरगाव, हुंबरळी, नवजातील ओझर्डे धबधब्याची व शेतीची पाहणी केली. त्यानंतर कोयना प्रकल्पाच्या शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी सिंह यांनी जिल्ह्याच्या नुकसानीचा आढावा दिला.

Central Committee koyana visit
रंग बदलण्याचे धाडस महाविकास आघाडी सरकारमध्येच : उद्धव ठाकरे

केंद्रीय समितीचे प्रमूख रवनिशकुमार, महिंद्र सहारे, पुजा जैन, देवेंद्र चाफेकर, प्रांताधिकारी सुनील गाढे, तहसीलदार योगेश्वर टोम्पे, रमेश पाटील, विवेक जाधव, गटविकास आधिकारी मिना साळुंखे ,सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकात माळी, कार्यकारी अभियंता नितीश पोतदार, कार्यकारी उपअभियंता अजित पाटील,तलाठी रमेश टिपुगडे आदी उपस्थित होते.

Central Committee koyana visit
लस उपलब्ध होताच, मुलांचे लसीकरण : अजित पवार; पाहा व्हिडिओ

बैठकीत जिल्हाधिकारी सिंह यांनी रेकॉर्डब्रेक पावसाने जिल्ह्याचे कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यातील पाटण व महाबळेश्वर या तालुक्यात नुकसानीची मोठी आकडेवारी आहे. एनडीआरएफने या आपत्तीत चांगले काम केले. सार्वजनीक मालमत्तेचे व शेतीचे झालेले नुकसान मोठे आहे. भूस्खलनात 48 लोकांचे जीव गेले. राज्य शासनाने तातडीने मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत दिली. केंद्र शासनाने मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. मात्र त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. जिल्ह्यासाठी केंद्राकडुन 827.33 कोंटी रुपयाचा निधी तातडीने मिळावा, अशी मागणी केली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in