बाळासाहेब पाटलांनाही शशिकांत शिंदेंच्या पराभवाचे दुःख

शिंदेंनी (Shashikant Shinde) उशीरा सुरुवात करुन चांगली मजल गाठली असल्याचे बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) म्हणाले.
बाळासाहेब पाटलांनाही शशिकांत शिंदेंच्या पराभवाचे दुःख
Balasaheb Patil & Shashikant ShindeSarkarnama

सातारा : सातारा जिल्हा बॅकेच्या निवडणुकीत (Satara District Bank Election) कऱ्हाड तालुक्यातील मतदारांनी मला थेट बॅंकेत जाण्याची संधी दिली आहे. जिल्हा बॅकेच्या निवडणुकीसाठी राजकीय संदर्भ वेगळे असतात. मात्र, निडवणुकीमुळे राजकीय समिकरणे बदण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सुचक वक्तव्य सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी आज (ता.23 नोव्हेंबर) सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतील विजयानंतर केले. ते माध्यमांशी बोलत होते.

Balasaheb Patil & Shashikant Shinde
सांगली जिल्हा बँकेत महाविकास आघाडीचा एकतर्फी विजय, जेसीबीने उधळला गुलाल  

निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळा यांच्याकडुन पाटील यांनी निवडून आल्याचे प्रमाणपत्र स्विकारल्यावर ते म्हणाले, निवडणुकीत सहकार पॅनेलला चांगले यश मिळाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासुनच यश मिळेल अशी परिस्थिती होती. अर्ज माघारीच्या दिवशीच ११ जागा बिनविरोध झाल्याने उर्वरीत दहा जागांसाठी निवडणूक झाली होती. त्यामध्ये सहकार पॅनेलचा विजयी केल्याबद्दल सर्व मतदारांचे मी आभार मानतो. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी माझ्यावर सहकारमंत्री आणि सातारा जिल्‍ह्याची पालकमंत्री म्हणुन जबाबदारी दिली. त्यामुळे या निवडणुकीला वेगळेच महत्व प्राप्त झाले असल्याचे त्यांनी सांगितले

Balasaheb Patil & Shashikant Shinde
सहा वर्षांपुर्वी याच दिवशी झाला होता पराभव अन् आज चिठ्ठीनं उजळलं गोरेंचं नशीब!

निवडणुकीसाठी तुम्ही भाजप नेत्यांची मदत घेतली आहे या प्रश्‍नावर ते म्हणाले, जिल्हा बॅकेच्या निवडणुका या राजकीय गटतट विसरुन केल्या जातात. मला कऱ्हाड दक्षिणमधील डॉ. सुरेश भोसले, अतुल भोसले, मदनराव मोहिते, भिमराव पाटील, जगदीश जगताप, धनंजय पाटील, कऱ्हाड उत्तरमधील मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील व सहकाऱ्यांनी निवडणुकीत सहकार्य केल्याने हा विजय झाला, असल्याचे त्यांनी सांगितले.

शशिकांत शिंदेच्या पराभवाचे शल्य

आमदार शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव झाला याचे शल्य निश्‍चीत आहे, असे सांगत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयावर शिंदेच्या समर्थकांनी दगडफेक केल्याची माहीती मला आत्ताच पोलिसांनी दिली आहे. शिंदेंच्या विजयासाठी सर्वांनी प्रयत्न केले. सर्वांशी चर्चा केली. मात्र, जे मतदार बाहेरगावी गेले होते. ते लवकर आले नाहीत. त्यामुळे हा तणाव वाढत गेला. त्याचा निकालावर परिणाम झाला आहे. तरीही शिंदेंनी उशीरा सुरुवात करुन चांगली मजल गाठली, असे पाटील यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in