अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील ते मृत दहा जण होते कोविड रुग्ण : ही आहेत त्यांची नावे

अहमदनगर ( Ahmednagar ) जिल्हा रुग्णालयात नवीन तयार केलेल्या कोविड ( Covid ) विभागातील अतिदक्षता विभागात 17 कोविड रुग्ण उपचार घेत होते. त्यातील दहा जणांचा आज मृत्यू झाला.
Ahmednagar District Hospital
Ahmednagar District HospitalDatta Ingale

अहमदनगर : अहमदनगर शहरात कोरोना रुग्णांचे प्रमाण वेगात घटत आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात नवीन तयार केलेल्या कोविड विभागातील अतिदक्षता विभागात 17 कोविड रुग्ण उपचार घेत होते. त्यातील दहा जणांचा आज मृत्यू झाला. ही आग शॉकसर्केटमुळे लागली होती, अशी अधिकृत माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये सहा पुरूष व चार महिलांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण ज्येष्ठ नागरिक होते. The dead at the Ahmednagar District Hospital were ten Covid patients

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात काही दिवसांपूर्वीच जिल्हा शल्यचिकित्सकांच्याही वाहनाला अचानक आग लागली होती. या बाबत चौकशी सुरू असतानाच आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागली. आग व धुराचे लोट दिसल्यावर कर्मचारी व प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. घटना माहिती होताच महापालिकेचे अग्निशमन विभागाचे पथक घटना स्थळी दाखल झाले. मात्र आग वेगात पसरली. तसेच धुराचे लोटही उठले. अतिदक्षता विभागात अत्यावस्थ अवस्थेत असलेल्या 10 कोरोना रुग्णांचा यात मृत्यू झाला. ऐन भाऊबिजेच्या दिवशीच ही घटना घडल्याने रुग्णांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Ahmednagar District Hospital
नगर तिसऱ्या लाटेच्या तोंडावर ! दिवसभरात आढळले हजारावर कोरोना पाॅझिटिव्ह

घटना स्थळाला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व आमदार संग्राम जगताप यांनी भेट दिली त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित पत्रकारांना घटनेची माहिती दिली. जिल्हाधिकारी भोसले म्हणाले, जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कोविडचे 17 रुग्ण होते. त्या वॉर्डला सकाळी अचानक आग लागली. त्यात 10 रुग्णांचा मृत्यू झाला. एक रुग्णाची स्थिती गंभीर आहे. त्या सर्व रुग्णांच्या शवविच्छेदनानंतरच मृत्यूची कारणे कळतील. या विभागाच्या बिलिंग व फायर ऑडिट संदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत. प्राथमिक दृष्ट्या शॉकसर्केटमुळे आग लागल्याचे महापालिका अग्निशमन अधिकाऱ्यांनी मला सांगितले आहे.

ते पुढे म्हणाले, या अतिदक्षता विभागाचे फायर ऑडिट झालेले होते. नातेवाईकांच्या तक्रारी नुसार चौकशी होईल. रुग्णांच्या नातेवाईकांना योग्य ती मदत दिली जाईल. या संदर्भात माझे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणे झालेले आहे. या घटनेमुळे अतिदक्षता विभागातील 1 रुग्ण खासगी रुग्णालयात तर इतर रुग्ण जिल्हा रुग्णालयातीलच इतर विभागांत हलविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी भोसले यांनी दिली.

ही आहेत मृतांची नावे

रामकिसन विठ्ठल हरपुडे ( वय 70, माका, ता. नेवासे )

सिताराम दगडू जाधव (वय 83, बख्तरपूर, ता. शेवगाव)

सत्यभामा शिवाजी घोडचौरे (वय 65, तेलकुडगाव, ता. नेवासे)

कडूबाळ गंगाधर खाटिक (वय 65, पाथरवाला, ता. नेवासे)

भिवाजी सदाशिव पवार (वय 80, किन्ही, ता. पारनेर)

दीपक विश्वनाथ जेडगुले (वय 37, अश्वी, ता. संगमनेर)

कोंडाबाई मधुकर कदम (वय 70, केडगाव, ता. नगर)

आसराबाई गोविंद नांगरे (वय 58, शेवगाव, ता. शेवगाव)

छबाबी अहमद सय्यद (वय 65, शेंडी, ता. नगर)

एक अनोळखी मृतदेह वय अंदाजे 58 वर्षे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com