Ajit Pawar News : सध्याचे सरकार भ्रष्टाचाराने बरबटलंय; बदल्यांसाठीही त्यांचे रेट ठरलेत... अजित पवारांची जहरी टीका

Ajit Pawar कोरेगाव येथे बाजार समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार व रामराजेच्या आभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
Devendra Fadanvis, Eknath Shinde, Ajit Pawar
Devendra Fadanvis, Eknath Shinde, Ajit Pawarsarkarnama

Koregaon News : सध्याचे हे सरकार भ्रष्टाचाराने बरबटले असून बदल्यांसाठी रेट ठरला आहे, असा गंभीर आराेप विरोधी पक्ष नेते अजित पवार AJit Pawar यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर Shinde-Fadanvis Government केला.दरम्यान, सातारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था ढासऴली असून एका कार्यकर्त्याने मला दाखविलेला फोटो पाहून धक्काच बसला. मनगट ताेडण्याचे काम जर काेण करीत असेल आणि सरकार काय झाेपा काढतंय का, असा प्रश्न त्यांनी केला.

कोरेगाव येथे बाजार समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार व रामराजेच्या आभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील,दीपक चव्हाण, नितीन पाटील, सुनील माने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, आताच्या सरकारचे मंत्री कोणाला विचारात नाहीत, मंत्रिमंडळात बसत नाहीत. काही जणांकडून घाणेरडे शब्द वापरले जातात. हे सर्व पाहून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या डोळ्यात पाणी येतं असेल असेही पवारांनी नमूद केले.

Devendra Fadanvis, Eknath Shinde, Ajit Pawar
Ajit Pawar News : आताच्या राज्यकर्त्यांना जनतेने नाकारलंय... अजित पवार

पवार म्हणाले, शिंदे- फडणवीस सरकारला सत्तेचा माज चढला आहे. केवळ ठराविक आमदारांना सांभाळायचं चालले आहे. निधी देताना मुद्दाम आडकाठी आणली जाते. राज्यात भ्रष्टाचार बोकाळला आहे. सरकराने बदल्यांसाठी रेट ठरविल्याचा गंभीर आराेप अजित पवार यांनी केला.

Devendra Fadanvis, Eknath Shinde, Ajit Pawar
Shashikant Shinde Vs Mahesh Shinde: साताऱ्यात राजकारण तापलं; जिहे-कटापूर पाणी योजनेवरुन शशिकांत शिंदे- महेश शिंदेंमध्ये जुंपली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com