लाच घेणाऱ्या महसूल विभागातील लिपिकाला झाली शिक्षा

आरोपी सुभाष भारती याला संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी दोषी धरत शिक्षा ठोठावली.
corruption
corruptionSarkarnama

अहमदनगर - आठ वर्षांपूर्वी कारवाईचा पंचनाम न करता पुढील कारवाई करू नये यासाठी नायब तहसीलदार सह दोन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले होते. त्यातील आरोपी सुभाष भारती याला संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी दोषी धरत शिक्षा ठोठावली. ( The clerk of the revenue department who took the bribe was punished )

आरोपींमध्ये संगमनेर तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपिक सुभाष विठ्ठल भारती, नायब तहसीलदार शीतल राजभर सावळे यांचा यामध्ये समावेश आहे यातील सुभाष भारती यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली तर शीतल सावळे यांची निर्दोषमुक्तता केली.

corruption
नगर जिल्ह्यात शिवसेनेचा सत्तेसाठी संघर्ष

माहिती अशी की, महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगमनेर तालुक्यातील राकनोली येथील एका व्यवसायिकाच्या ताब्यातील वाळूचा पंचनामा केला होता. मात्र त्यांच्याविरुध्द पुढील कायदेशीर कारवाई न करण्यासाठी शीतल सावळे यांनी 8 जुलै 2014 रोजी पंचासमक्ष तक्रारदारकडून 16 हजार रुपये लाचेची मागणी करून सुभाष भारती यांच्या हस्ते स्वीकारले. त्यामुळे या दोघांना पकडले होते.

या संदर्भात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात 8 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप अधीक्षक अशोक देवरे यांनी सापळा रचून कारवाई केली होती. तसेच गुन्ह्याचा तपास केली. संगमनेर विशेष न्यायालयात या दोन्ही आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र 19 नोव्हेंबर 2015ला दाखल केले होते.

corruption
इम्तियाज जलिल येताच नगरमध्ये लागली आग : राजकीय वातावरण तापले

या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.एस. घुमरे यांच्या समोर होऊन पोलिसांनी केलेला चांगला तपास व महत्वाच्या साक्षीच्या आधारे न्यायालयाने सुभाष भारती याला 3 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व तीन हजार रुपये दंड, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार 4 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व 4 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 4 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. तर शीतल सावळे यास संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्त केले आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड. बी. जी. कोल्हे यांनी काम पाहिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com