गोव्याचे मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लवकरच रामराज्य येईल

गोव्याचे मुख्यमंत्री तथा भाजप नेते प्रमोद सावंत यांनी शनिशिंगणापूर येथे शनिदेवांचे दर्शन घेऊन अभिषेक केला.
Pramod Sawant while visiting Shani Deva
Pramod Sawant while visiting Shani DevaSarkarnama

सोनई ( जि. अहमदनगर) - गोवा विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक सुरू आहेत. या निवडणुकीचा निकाल 10 मार्चला लागणार आहे. या पार्श्वभूमीवर गोव्याचे मुख्यमंत्री तथा भाजप नेते प्रमोद सावंत यांनी शनिशिंगणापूर येथे शनिदेवांचे दर्शन घेऊन अभिषेक केला. या प्रसंगी त्यांनी सरकारनामाला दिलेल्या विशेष मुलाखतीत महाराष्ट्रातील मंत्र्यांवर होत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने ( ED ) केलेल्या कारवाईचे समर्थन केले आहे. ( The Chief Minister of Goa said that Ram Rajya will soon come to the whole country including Maharashtra )

मुख्यमंत्री सावंत यांनी आज दुपारी शनिशिंगणापुरला भेट देवून उदासी महाराज मठात शांतिपाठ, संकल्प, तेल अभिषेक व प्रार्थना करुन शनिदेवाचे दर्शन घेतले. जनसंपर्क कार्यालयात देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व प्रसाद देवून सन्मान केला. यावेळी विश्वस्त दीपक दरंदले, बाळासाहेब बन्सी बोरुडे उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले यांनी देवस्थान विकास कामांची माहिती दिली.

Pramod Sawant while visiting Shani Deva
नीलेश लंकेंना पारनेरमध्ये जाऊन शंकरराव गडाख यांचे उत्तर

प्रमोद सावंत म्हणाले, महाराष्ट्रात एका मागोमाग एक मंत्र्यांच्या हातात बेड्या पडणे योग्य नाही. या घटनेत केंद्र सरकारचा अजिबात हस्तक्षेप नसुन अडकणारे महाविकास आघाडीचे मंत्री आपल्या कर्माचे फळ भोगत आहेत, अशी टीका सावंत यांनी केली.

शनिदेवाला काय मागितले असे विचारले असता त्यांनी गोवा राज्यात पुन्हा 'भाजपा'चे स्वराज्य नांदू दे व देशावर आलेले कोरोनाचे संकट पूर्णपणे हटू दे अशी प्रार्थना केली. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लवकरच रामराज्य येईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकार ईडी यंत्रणेवर कुठलाच हस्तक्षेप करीत नसल्याचे सांगितले.

Pramod Sawant while visiting Shani Deva
गोव्यात भाजपची मोदी लाट तर उत्पल पर्रीकरांची मूक लाट!

गोव्यातील स्थिती बाबत ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामांवर सर्वसामान्य जनता,शेतकरी, लहान-मोठे व्यावसायिक खुष आहेत. राज्यात केलेला विकास सर्वाना भावणारा असल्याने या निवडणुकीत 'भाजप' ला 22 ते 24 जागा नक्की मिळतील. सरकार पण आमचेच होणार असा विश्वास सावंत यांनी बोलताना व्यक्त केला.

Pramod Sawant while visiting Shani Deva
Video: 'गोव्यात भाजपची एकहाती सत्ता येणार, कोणीही किंगमेकर होणार नाही',प्रमोद सावंत

फडणवीस यांच्यासाठी साकडे..

मुख्यमंत्री सावंत यांनी उदासी महाराज मठात नेहमीची पुजा केल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा महाराष्ट्रात मानाचे स्थान मिळावे याकरीता संकल्प करुन शनिदेवाला साकडे घातले. या पूजेचे पौरोहित्य मुख्य पुजारी अशोक कुलकर्णी यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com