बुलेट ट्रेन फलटणमार्गे वळवण्यासह विमानसेवा सुरू करणार...

रेल्वे Railway व राष्ट्रीय महामार्गाप्रमाणेच National Highway फलटण Phaltan हवाई Airway मार्गाने जगाशी जोडण्यासाठी आगामी काळात येथे प्रशस्त विमानतळ Airport आणि हवाई वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर Ranjitsinh Naik Nimbalkar यांनी सांगितले.
Ranjitsinh Naik Nimbalkar
Ranjitsinh Naik NimbalkarSarkarnama

फलटण शहर : फलटण- पंढरपूर रेल्वे मार्ग, फलटण- पुणे- मुंबई मार्गावर रेल्वे सेवा, बुलेट ट्रेन- फलटणमार्गे वळविणे, फलटण राष्ट्रीय महामार्गाद्वारे विकसित करणे आणि फलटणमधून विमानसेवा सुरू करण्याचा आपला प्रयत्न आहे. रेल्वे व राष्ट्रीय महामार्गाप्रमाणेच फलटण हवाई मार्गाने जगाशी जोडण्यासाठी आगामी काळात येथे प्रशस्त विमानतळ आणि हवाई वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, ''फलटण- पंढरपूर लोहमार्ग हा १४०० कोटी रुपयांचा प्रकल्प असून, त्यापैकी ५० टक्के हिस्सा राज्य सरकारने उचलावा, अशी अपेक्षा आहे. आतापर्यंत केंद्राने तीन वेळा याबाबत राज्य सरकारशी पत्रव्यवहार केला आहे. वास्तविक या लोहमार्गाचा लाभ जसा भाविकांना होणार आहे, तसा शेतमाल व औद्योगिक उत्पादनांच्या वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणार आहे. राज्याच्या हिताच्या या प्रकल्पासाठी राज्य सरकारचा सहभाग असणे आवश्यक आहे.

Ranjitsinh Naik Nimbalkar
खासदार रणजितसिंह निंबाळकरांवर भाजपने सोपवली महत्वाची जबाबदारी!

राज्य सरकारने नकार कायम ठेवल्यास आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून या प्रकल्पाची पूर्तता करणार आहे. लोणंद- फलटण- बारामती या लोहमार्गापैकी लोणंद- फलटण मार्गावर रेल्वे सेवा सुरू झाली आहे. तथापि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ती बंद असली, तरी लवकरच सुरू होईल. फलटण- लोणंद- पुणे- मुंबई अशी रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.''

Ranjitsinh Naik Nimbalkar
खासदार रणजितसिंह निंबाळकरांना केंद्रीय मंत्रीमंडळात संधी मिळणार?

फलटण तालुक्यात कांदा आणि आंबा, डाळिंब, द्राक्षे, पेरू वगैरे फळांचे, तसेच फळभाज्या व पाले भाज्यांचे उत्पादन मोठे आहे. मात्र, त्यावर प्रक्रिया करून परदेशी पाठविण्याची व्यवस्था नसल्याने आजही शेती उत्पादने कवडीमोलाने विकली जात असून, रात्रंदिवस काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना शेती उत्पादनांचे रास्त भाव मिळाले पाहिजेत, यासाठी कांद्यावर प्रक्रिया करून त्याची पावडर आणि आंब्यासह सर्व प्रकारची फळे, फळ भाज्या व पालेभाज्यांचे निर्यातीच्या नियम, निकषांनुसार निर्जंतुकीकरण आणि त्यावर प्रक्रिया करून निर्यातक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Ranjitsinh Naik Nimbalkar
साताऱ्यात कोरोनाचा कहर सुरूच; सातारा, फलटण, खटाव तालुके हॉटस्पॉट 

अलीकडे वाढते उसाचे क्षेत्रामुळे वाढलेल्या साखर उत्पादनाची हेळसांड टाळण्यासाठी आशिया खंडातील सर्वात मोठा इथेनॉल प्रकल्प आपण स्वतः उभारला असून, त्यामुळे शेतकऱ्यांना उसाची सर्वाधिक व वेळेवर किंमत देण्याबरोबर इंधनाची गरज भागविणे शक्य होणार असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in