राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराची लक्तरे रोज वेशीवर टांगली जात आहेत

आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी महाविकास आघाडीवर टीकेची तोफ डागली.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama

महेश माळवे

श्रीरामपूर ( जि. अहमदनगर ) - जिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद नवले यांच्या निधीतून बेलापूर येथे विविध विकास कामांचा प्रारंभ व लोकार्पण भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी बोलताना महाविकास आघाडीवर टीकेची तोफ डागली. ( The arms of state government corruption are being hung on the gates every day )

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरद नवले होते. यावेळी दीपक पटारे, सुनील मुथा, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, नानासाहेब शिंदे, बाळासाहेब तोरणे, संगिता गांगुर्डे, गिरीधर आसने, गणेश मुदगुले, भीमभाऊ बांद्रे, अनिल थोरात आदी उपस्थित होते.

Radhakrishna Vikhe Patil
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, महाविकास आघाडीकडे बाबासाहेबांच्या स्मारकाला निधी नाही

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, राज्य सरकारमध्ये रोज वैचारिक गोंधळ पहायला मिळतो आहे. प्रत्येक मंत्री मुख्यमंत्री आहे. अपयश झाकण्यासाठी राज्यातील वसुली सरकारचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत. त्यात सामान्य माणूस भरडला जात आहे. राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराची लक्तरे रोज वेशीवर टांगली जात असल्याचा आरोप करत माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले.

आमदार विखे पाटील पुढे म्हणाले, राज्यातील आघाडी सरकारची पत ढासळल्यामुळे कोणी गुंतवणूकदार राज्यात यायला तयार नाहीत. महाविकास आघाडीचा एक-एक मंत्री तुरुंगात जात आहे. दारू मुक्तीचा निर्णय घेतला. मंत्र्यांनाच पैसे पुरेनात ते जनतेला काय देणार? असा प्रश्न उपस्थित केला.

Radhakrishna Vikhe Patil
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, आदिवासींच्या जमीन खरेदीमध्ये मोठा गोंधळ...

एस.टी.कर्मचाऱ्यांचा संप सत्तेचा दुरूपयोग करून मोडित काढला. 150 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या कुटुंबियांना सरकार न्याय देऊ शकले नाही. शेतीमाल उद्ध्वस्त झाला. त्या शेतकऱ्यांना मदत करू शकलो नाही. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 120 कोटी जनतेचे निशुल्क लसीकरण करण्यात आले. कोरोनाच्या काळात 1 लाख 60 हजार कोटी खर्च करुन गोरगरिबांना मोफत धान्य देऊन त्यांची भूक भागविली. काश्मिरसह देशभर पंचायत राजच्या माध्यमातून गावागावांत विकास करण्यासाठी तसेच वंचित भागांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धाडसी पाऊले टाकली जात आहेत. दहशतवादाची चर्चा बंद होऊन नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे.

देविदास देसाई यांनी सूत्रसंचालन केले. प्रफुल्ल डावरे यांनी आभार मानले.

Radhakrishna Vikhe Patil
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, निळवंडेच्या गप्पा मारणारे 30 वर्षांपूर्वी कुठे होते...

महसूल खात्यात बदल्यांचे टेंडर

राज्यात वाळूमाफियांनी उच्छाद मांडलाय आहे. महसूल खात्यात बदल्यांचे टेंडर काढले जातात. तसे दरपत्रकच तयार केले आहेत. राज्याची एव्हढी बिकट अवस्था कधीच झाली नव्हती. गोरगरिबांच्या जमिनी भांडवलदार, बिल्डरांना देण्याचे काम सुरू असल्याचा आरोप महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता विखे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in