अजितदादांचे मामेभाऊ अध्यक्ष असलेल्या कारखान्यावरील शोधमोहीम तब्बल ८७ तासांनी संपली

आमच्या दृष्टीने तपासणीत काही आक्षेपार्ह आढळलेले नाही.
अजितदादांचे मामेभाऊ अध्यक्ष असलेल्या कारखान्यावरील शोधमोहीम तब्बल ८७ तासांनी संपली
Daund Sugar Factorysarkarnama

दौंड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सख्खे मामेभाऊ अध्यक्ष असलेल्या दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यातील (Sugar Factory) प्राप्तीकर विभागाची शोध मोहिम ८७ तासानंतर संपली आहे. शोध मोहिमेत काही आक्षेपार्ह आढळले नसल्याचा दावा कारखान्याच्या वतीने करण्यात आला आहे.

दौंड तालुक्यातील आलेगाव येथील दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्यात प्राप्तीकर विभागाने भारतीय प्राप्तीकर अधिनियम कलम १३२ अन्वये ७ ऑक्टोबर सकाळपासून शोध मोहिम सुरू केली होती. सुरक्षा आणि खबरदारीचा उपाय म्हणून मोहिमेंतर्गत केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) चे सशस्त्र जवान तैनात करण्यात आले होते. अजित पवार यांचे सख्खे मामेभाऊ जगदीश कदम (रा. देवळाली प्रवरा, जि. नगर) हे कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आहेत तर लिंगाळी (ता. दौंड) येथील पुणे जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे संचालक आहेत.

Daund Sugar Factory
भाजपच्या पायाखालची वाळू सरकली; पक्ष नेतृत्वाची उत्तर प्रदेशसाठी चार तास बैठक

जगदीश कदम यांची प्राप्तीकर विभागाने पुणे येथे चौकशी केली. तर वीरधवल जगदाळे यांच्याकडे कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीत कारखान्याचे व्यवहार व करविषयक विचारणा करण्यात आली. प्राप्तीकर विभागाकडून ४ दिवसात साखर, इथेनॅाल, आदींचा साठा आणि नोंदी तपासण्यात आल्या. त्याचबरोबर कारखान्याच्या आर्थिक व्यवहरांशी संबंधित कागदपत्रांची व डिजिटल डाटाची पाहणी आणि पडताळणी करण्यात आली. शोध मोहिम सुरू असताना १० ऑक्टोबर रोजी सकाळी कारखान्याचा बॅायलर प्रदीपन सोहळा व तेराव्या गळित हंगामाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला होता. प्राप्तीकर विभागाचे अधिकारी १० ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजता कारखान्याच्या प्रशासकीय इमारत मधून शोध मोहिम संपवून रवाना झाले.

Daund Sugar Factory
काँग्रेसला धक्का; माजी मंत्र्यांचे बंधू भाजपमध्ये प्रवेश करणार

शोध मोहिमेविषयी वीरधवल जगदाळे म्हणाले की, ''कारखान्यात साठा तपासणी व नोंदींमध्ये किरकोळ विषय वगळता तफावत आढळलेली नाही. कारखान्याकडून आगाऊ व देय कर नियमितपणे भरला जातो. प्राप्तीकर विभागाला मागितलेली माहिती देण्यात आली आहे. चालू वर्षीचा साठा तपासण्यात आला व आवश्यक माहितीचे प्रिंटआऊट त्यांनी नेले आहेत. आमच्या दृष्टीने तपासणीत काही आक्षेपार्ह आढळलेले नाही. काही माहिती सादर करण्यासाठी कारखान्याने मुदत मागून घेतलेली आहे. दौंड शुगर हा कारखाना कोणाचा आहे, यापेक्षा तो शेतकरी आणि ऊस उत्पादकांचे हित जोपासत आहे हे महत्वाचे आहे.

Related Stories

No stories found.