त्यावेळी प्रणव मुखर्जी म्हणाले होते, ‘को-ऑपरेटिव्हपर लोगोंका इतना विश्वास है...बॅंकोंमें इतना पैसा है?

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सहकार क्षेत्राकडे दिल्लीचा दृष्टीकोन विशद केला.
त्यावेळी प्रणव मुखर्जी म्हणाले होते, ‘को-ऑपरेटिव्हपर लोगोंका इतना विश्वास है...बॅंकोंमें इतना पैसा है?
Balasaheb Patil-sharad pawar-Nitin Gadkari-Vidyadhar AnaskarSarkarnama

मुंबई : गुजरात आणि महाराष्ट्रातील लोकांना सहकार क्षेत्राचे महत्व समजले, तेवढे महत्व भारतातील इतर राज्यातील लोकांना माहितीच नाही. प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना मी आणि शरद पवार त्यांच्याकडे गेलो होतो, त्यावेळी मी त्यांना सहकारी बॅंका आणि त्यातील डिपॉझिटबाबत सांगत होतो. त्यावर ते म्हणाले की, ‘क्या बोल रहे हो ये नितीन. ‘को-ऑपरेटीव्ह’पर लोगोंका इतना विश्वास है! को-ऑपरेटीव्ह बॅंकोंमें इतना पैसा है! मी त्यांना म्हटलं की हाँ...’ त्यामुळे सहकार क्षेत्राबाबत उत्तरप्रदेश, बिहार व देशातील इतर राज्यांत बऱ्याच अडचणी आहेत, अशा किस्सा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री यांनी सांगितला. (That time, Pranab Mukherjee had said, people have so much faith in the co-operative sector : Gadkari)

दरम्यान, गुजरात आणि महाराष्ट्र वगळता सहकार क्षेत्राबाबत उत्तरप्रदेश, बिहार व देशातील इतर राज्यांत बऱ्याच अडचणी आहेत. सहकार क्षेत्रातील चांगलं फार कमी पाहिल्याने आणि वाईटच जादा पाहिल्याने दिल्लीतील प्रशासकांचीही सहकार क्षेत्राबाबतची भूमिका तशीच बनली आहे, असे सांगून केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सहकार क्षेत्राकडे दिल्लीचा दृष्टीकोनही विशद केला.

महाराष्ट्रात सहकाराची मुहूर्तमेढ रोवणारे वैकुंठभाई मेहता, सर विठ्ठलदास ठाकरसी, प्रा. धनंजयराव गाडगीळ यांच्या तैलचित्राचे राज्य सहकारी बॅंकेच्या कार्यालयात अनावरण करण्यात आले. त्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. या वेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

Balasaheb Patil-sharad pawar-Nitin Gadkari-Vidyadhar Anaskar
आढळराव केंद्रात मंत्री होणार...कसे ते त्यांना आणि आम्हालाच माहीत : भाजप पदाधिकाऱ्याची गुगली

मेहता, ठाकरसी, प्रा. गाडगीळ यांनी प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्राला सहकाराचा मूलमंत्र दिला. त्यातून सहकारी कारखानदारी, बॅंका अस्तित्वात आल्या. सहकाराचा महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थकारणावर काय परिणाम झाला आहे, हे पाहिल्यावर सहकाराचे महत्व कळते. देशातील ८० लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ह्या सहकार धुरिणींनी सहकाराचा महामंत्र दिला. पण, आपल्या कृषी क्षेत्राचा विकासदर अजूनही वाढलेला नाही, ही मोठी अडचण आहे. कृषी क्षेत्राचे मागासलेपण हेच देशाच्या समस्येचे मोठे कारण आहे. ते दूर करण्यात सहकाराची भूमिका कशी यशस्वी आहे, हे कोल्हापूर जिल्ह्याने दाखवून दिले आहे. कृषी क्षेत्रातील सर्वाधिक ग्रोथ रेट देशात कोल्हापूरचा सर्वाधिक आहे. त्याचे कारण सहकारी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा उच्चांक गाठला, त्यामुळेच कृषी क्षेत्राचा ग्रोथ रेट वाढला आहे.

Balasaheb Patil-sharad pawar-Nitin Gadkari-Vidyadhar Anaskar
श्रीरामपूर पंचायत समिती सभापतीपदाची गुरुवारी निवडणूक

मला वाटतं सहकार क्षेत्राला फायदा आहे. सहकार क्षेत्र हे काळानुरुप बदलायला हवे. टेक्नॉलॉजीचादेखील वापर व्हायला हवा. काळाच्या ओघात स्वतःला बदलले, तरच आपण या स्पर्धेत टिकू शकतो. राज्यातल्या सहकार चळवळीचे मूल्यमापन करायचे असेल तर ग्रामीण भागातील जनतेवर काय परिणाम झाला, याचे मापन केले तर याचे आपण महत्व समजू शकतो. आपल्या देशातील कृषी क्षेत्राचा ग्रोथ रेट कमी आहे, तीच देशापुढील खरी शोकांतिका आहे. देशाच्या ग्रोथमध्ये जे उद्दिष्ट गाठायला हवे, ते त्याचमुळे गाठता येत नाही. पण, सहकार क्षेत्रामुळे ग्रोथ रेट वाढू शकतो, आज कोल्हापूरमध्ये सहकारी साखर कारखाने असल्याने तिथे ग्रोथ रेट चांगला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.