शरद पवारांचे ते विधान म्हणजे मोठा विनोद : चंद्रकांतदादांचा दावा
Chandrakant PatilSarkarnama

शरद पवारांचे ते विधान म्हणजे मोठा विनोद : चंद्रकांतदादांचा दावा

उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांच्या वक्तव्याला भाजपचे ( BJP ) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उत्तर दिले आहे.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाजपवर टीका केली होती. या टीकेमुळेच आम्हा कुटूंबीयांवर आयकर विभागाचे छापे टाकले जात असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. या वक्तव्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उत्तर दिले आहे. That statement of Sharad Pawar is a big joke: Chandrakantdada's claim

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या घरे किंवा कार्यालयांवर आयकर खात्याने टाकलेल्या छाप्यांचा संबंध भारतीय जनता पक्षाशी जोडणे हास्यास्पद आहे. लखीमपूर खिरी प्रकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या टीकेमुळे हे छापे मारण्यात आल्याचा दावा म्हणजे मोठाच विनोद आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Chandrakant Patil
नाथाभाऊ, शूटर लावून मला मारून टाका : चंद्रकांत पाटील

त्यांनी पुढे म्हटले आहे की, काल राज्यातील विविध ठिकाणी आयकर खात्याने मारलेले छापे गेले सहा महिने गोळा केलेल्या माहितीच्या आधारे आहेत, असे त्या खात्याने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. अशा स्थितीत काही दिवसांपूर्वी घडलेल्या लखीमपूर खिरी प्रकरणाबाबत शरद पवार यांनी खंबीर भूमिका घेतली म्हणून छापासत्र झाले असावे असे सांगणे हा मोठाच विनोद आहे.

राज्यातील 25 निवासस्थाने आणि 15 कार्यालयांवरील छापे हे एक-दोन दिवसांच्या तयारीने होऊ शकत नाही. आयकर खात्याने याबाबत बरीच तयारी केली असावी, हे या कारवाईच्या व्यापक स्वरुपावरून दिसते.

Chandrakant Patil
चंद्रकांत पाटील म्हणाले; पुण्यात कुणी-किती जागा लाटल्या दोन दिवसात आकडे बोलणार

त्यांनी सांगितले की, आयकर विभाग ही स्वतंत्र केंद्रीय यंत्रणा आहे. ती तिच्या पद्धतीने कायद्याच्या चौकटीत काम करत असते. आयकर विभागाने काही आर्थिक व्यवहार उघडकीस आणले तर त्याला कायदेशीर पद्धतीनेच उत्तर दिले पाहिजे. अशा छाप्यांचा संबंध भारतीय जनता पक्षाशी जोडून राजकीय रंग देणे आणि त्या आधारे स्वतःला निर्दोष ठरविण्याचा प्रयत्न करणे हास्यास्पद आहे, असेही चंद्रकांत पाटलांनी सांगितले.

Related Stories

No stories found.