Ahmednagar Politics: 'त्या' एका फोनमुळे कर्डीलेंच्या अडचणी वाढणार: तनपुरेंची पोलीस ठाण्यात तक्रार

सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी पूर्ण राज्यात अशीच भाषा करत आहेत.
Ahmednagar Politics:
Ahmednagar Politics:

Ahmednagar Politics : भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले यांच्या विरोधात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कर्डीले यांच्याविरोधात गुन्हा दाकस करुन कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराच महाविकास आघाडीने दिला आहे. या संदर्भात या पुर्वीच महाविकास आघाडीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन दिले होते.

शिवाजी कर्डिले यांचे सुवेंद्र गांधी यांना दमदाटी करणारे मोबाईल फोन कॉल रेकोर्डिंग व्हायरल झाल्यावर याचा आधार घेत आमदार प्राजक्त तनपुरे यांनी बुऱ्हाणनगरच्या तुळजाभवानी मंदिराचे पुजारी अॅड.अभिषेक भगत यांनाही शिवाजी कर्डिले यांनी केलेल्या दमदाटी बद्दल आज पोलीस अधिक्षकांना निवेदन देवून त्यांच्यावर कडक कारवाई करावी या मागणीचे निवेदन महाविकास आघाडीच्या वतीने दिले.

माध्यमांशी बोलताना आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले, अनेक वर्ष आमदार असलेले व कायदेमंडळात काम केले अशा सध्याच्या माजी आमदार असलेल्या व्यक्तीने कायद्याचा अनादर करणे चुकीचे आहे. ते कायद्याचा अनादर करणारी भाषा जर बोलत असतील तर समाज मनावर याचा मोठा परिणाम होवू शकतो. माजी आमदार दमदाटी करून भाजपतील माजी खासदार पुत्राला फोन वर धमकी देत हात पाय तोडण्याची अरेरावीची भाषा करत आहेत.

सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी पूर्ण राज्यात अशीच भाषा करत आहेत. त्यामुळे हे कायद्याचे राज्य आहे का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. बुऱ्हाणनगरचे अॅड.अभिषेक भगत यांच्यावरही या माजी आमदाराने अन्याय केला आहे. त्यामुळे या राज्यात सर्वसामान्य नागरिक सुरक्षित नाही. यांची गुन्हेगारी प्रवृत्ती आजची नाही.

जर सत्ताधारी खुलेआम कायदे मोडण्याची भाषा करत असतील व त्यांच्यावर कोणतीच कारवाई न करता गुन्हा दाखल होत नसेल तर सर्वसामान्यांचा कायद्यावरील विश्वास उडेल. यासाठी अशा प्रवृत्तीवर कडक शासन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला पोलिसांची चौकशी चालू आहे. सीसीटीव्हीचे फुटेज व मोबाईल रेकॉर्डिंग तपासले जात असून लवकरच योग्य कारवाई करू असे आश्वासन दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com