Pandit Atomotive services, shivendraraje Bhosale
Pandit Atomotive services, shivendraraje Bhosalesatara reporter

पंडित ऑटोमोटिव्हचा तो लिलाव बेकायदेशीर; कामगार संघटनेची न्यायालयात हरकत

ऑटोमोटिव्ह सर्व्हिसेस कर्मचारी संघटनेने Atomotive Services Karmachari Sanghtna हा व्यवहार रद्द करण्याची मागणी उच्च न्यायालयात High court केली असून त्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे.

सातारा : पंडित ऑटोमोटिव्ह सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची मालमत्ता आणि जागेचा लिलाव आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला आहे. हा लिलाव अत्यंत बेकायदेशीर स्वरूपाचा आहे. या प्रक्रियेला कामगार संघटनेने उच्च न्यायालयामध्ये हरकत घेतली असून, त्याची सुनावणी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती ऑटोमोटिव्ह सर्व्हिसेस कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संतोष शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संतोष शिंदे म्हणाले, ''आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कंपनीची जागा व मालमत्ता एनसीएलटीच्या माध्यमातून लिलावात घेतली आहे. मुळात हा व्यवहारात बेकायदेशीर असून पूर्वक जाहीर केलेली नोटीस प्रक्रिया राबवून याच्यामध्ये आर्थिक घोटाळा संगनमताने करण्यात आला आहे. लिलाव प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवण्यात आली आहे. ऑटोमोटिव्ह सर्व्हिसेस कर्मचारी संघटनेने हा व्यवहार रद्द करण्याची मागणी उच्च न्यायालयात केली असून त्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे.

Pandit Atomotive services, shivendraraje Bhosale
शिवेंद्रसिंहराजे म्हणतात, सातारा पालिकेची निवडणूक आम्ही स्वबळावर लढणार

एक फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री उशिरा ॲग्रोटेक व कृषी ॲग्रोटेकच्या वेदांतिकाराजे भोसले व गिरीश सोमण यांच्या हस्तकांनी ऑटोमोटिव्हच्या जागेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करून कामगारांच्या पोटावर पाय दिला आहे. त्यांना तेथून जबरदस्तीने काढून रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिंदे यांनी केला. सातारा येथील कंपनीची बाजारभावाप्रमाणे किंमत ४० कोटी रुपये असताना लिलाव प्रक्रियेद्वारे केवळ आठ कोटीच्या मोबदल्यात कंपनी घेण्यात आली आहे.

Pandit Atomotive services, shivendraraje Bhosale
स्मार्ट सिटी कंपनी म्हणायचं की स्मार्ट भाजप कंपनी ?

गिरीश सोमण यांनी सुद्धा नऊ कोटी रुपयांची जागा बेकायदेशीर या प्रक्रियेद्वारे साडेतीन कोटीने घेतली आहे. या व्यवहारांच्या नोंदी शासकीय दप्तरी करू नयेत याकरिता कामगार संघटनेने ग्रामपंचायत कोडोली व तुंग सांगली सहायक कामगार आयुक्त दुय्यम निबंधक व विभागीय व्यवस्थापक एमआयडीसी यांच्याकडे कायदेशीर हरकती नोंदवल्या आहेत. ग्रामपंचायतींनी नोंदी करताना उच्च न्यायालयात निर्णयास अधिन राहून नोंद करीत असल्याचा शेरा दिला आहे. या घटनेमुळे परिसरातील उद्योजक गिळण्याचे काम सुरु असल्याचा आरोप ऑटोमोटिव्ह कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com