ठाण्याची दाढी योग्य टायमिंग आल्यावर कार्यक्रम करते... महेश शिंदे

राष्ट्रवादीला NCP विचारधारच Ideology itself नाही. त्यांचे म्हणजे, याचे उचल त्याचे उचल, भ्रष्टाचार Corruption कर, कारखाना factory खा, सुत गिरणी yarn mill खा, हाच त्यांचा विचार आहे.
MLA Mahesh Shinde
MLA Mahesh Shindesarkarnama

सातारा : सध्या आमच्याकडे मोठी लाईन आहे, त्यामुळे सब कतार मै है. मुख्यमंत्री म्हणजे ठाण्याची दाढी आहे, योग्य टायमिंग आल्यावर ते कार्यक्रम करतात. त्यामुळे ज्यांना दादागिरीपासून मुक्तता पाहिजे, ज्यांना खरोखर महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, अशा सगळ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बरोबर घेतील, अशी खोचक टीका कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी केली.

फलटणचे नेते माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे, याविषयी विचारले असता आमदार महेश शिंदे म्हणाले, हा वरिष्ठ पातळीवरील निर्णय आहे, मी छोटा आमदार असून ते सभापती आहेत, त्याचा निर्णय देश पातळीवरील नेते मंडळी घेतील. परवा खळं उठवलं आहे, आता वस्ती उठवायला वेळ लागणार नाही. आता बोजा बिस्तरा गुंडाळायला जास्त वेळ लागणार नाही, असा टोला आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला.

MLA Mahesh Shinde
रामराजे भाजपमध्ये येणार का, या प्रश्नावर जयकुमार गोरेंनी त्यांची `कुंडलीच` मांडली...

सध्या आमच्याकडे मोठी लाईन आहे, त्यामुळे सब कतार मै है. मुख्यमंत्री म्हणजे ठाण्याची दाढी आहेत, योग्य टायमिंग आल्यावर ते कार्यक्रम करतात, असे सांगून ते म्हणाले, त्यामुळे ज्यांना दादागिरीपासून मुक्तता पाहिजे, ज्यांना खरोखर महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, अशा सगळ्यांना मुख्यमंत्री बरोबर घेतली, अशी खोचक टीका शिंदे यांनी केली. पक्ष, संघटना टिकविण्यासाठी विचारांची गरज असते.

MLA Mahesh Shinde
पालापाचोळ्याची उपमा योग्य नाही; उद्धव साहेबांच्या तोंडी राऊतांची भाषा... शंभूराज देसाई

जशी बाळासाहेब ठाकरेंचे विचार आहेत, शिवसेनेतील प्रत्येकजण या विचारधरेशी संलग्न आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्ष आज जरी विरोधक असेल तरी त्यांची राष्ट्रीय विचारधारा असून त्यातून ती उभी राहिली. तशीच भाजपचीही विचारधारा आहे. पण, राष्ट्रवादीला विचारधारच नाही. त्यांचे म्हणजे, याचे उचल त्याचे उचल, भ्रष्टाचार कर, कारखाना खा, सुत गिरणी खा, हाच त्यांचा विचार आहे. त्यामुळे हे लोक कसे टिकणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. करून

MLA Mahesh Shinde
रामराजे नाईक निंबाळकरांची हॅटट्रीक ; फलटणमध्ये जल्लोष

महेश शिंदे म्हणाले, लोकांना बांधण्यासाठी विचारधारा लागते तीच त्यांच्याकडे नाही. यशवंतराव चव्हाणांची विचारधारा घेऊन ते आले होते, पण तीच ते विसरलेत. त्यामुळे पक्ष टकविणे अवघड झालं आहे, अशी टीका त्यांनी राष्ट्रवादीवर केली. शिवसेनेचे ८० टक्के जिल्हा प्रमुख एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम करणारे असून त्यांच्या संपर्कात आहेत. संघटना ही बरोबर असून व सगळेच बरोबर आहेत. तिकडचे आमदारही आमच्यासोबत आहेत. थोड्या दिवसात दिसेल.

MLA Mahesh Shinde
Koregaon : राज्यात शिंदेशाही; बारामतीकरांचे राज्य आता संपले... महेश शिंदे

मिठीत घेऊन स्वागत करेन...

आमदार शशीकांत शिंदे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे, याविषयी विचारले असता महेश शिंदे म्हणाले, फार आनंद होईल, त्यांना मिठीत घेऊन स्वागत करेन. त्यातून मी असा बोध घेईन की त्यांना त्यांचे नेते चुकीचे होते, याची उपरती झाली असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com