मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ठाकरेंची फिल्डिंग; भाजप आमदाराच्या भावालाच दिली मोठी जबाबदारी

Satara : उद्धव ठाकरेंनी मारले एका दगडात दोन पक्षी...
CM Eknath Shinde, Uddhav Thackeray Latest News
CM Eknath Shinde, Uddhav Thackeray Latest News sarkarnama

बिजवडी : माण खटाव मतदारसंघाचे शिवसेनेचे डँशिंग नेतृत्व व सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्या कार्याची दखल घेत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यांच्यावर शिवसेनेच्या सातारा (Satara) जिल्हा संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांना नुकतीच मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत या पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले.

दरम्यान, ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांचा बालेकिल्ला मानला जात असला, तरी सातारा हे त्यांचं होम पीच आहे. यामुळे या ठिकाणी शिंदे गटाला टक्कर द्यायची असेल, तर तेवढ्याच तोडीचा नेता देणे आवश्यक होते. त्यामुळे ठाकरेंनी भाजप (BJP) आमदार जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरेंनाच मैदानात उतरवले असल्याने ठाकरेंनी एका दगडात दोन पक्षी मारल्याचीही चर्चा राजकीय वर्तूळात रंगत आहे. (CM Eknath Shinde, Uddhav Thackeray Latest News)

CM Eknath Shinde, Uddhav Thackeray Latest News
Maval : मावळातील स्थानिकांच्या हक्कासाठी शेळके-भेगडे सरसावले...

माण मतदारसंघात स्वखर्चातून विकासकामे करणारे सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व म्हणून शेखर गोरेंची ओळख आहे. शेखर गोरेंनी शिवसेनेच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवत चांगली लढत दिली होती. तर मतदारसंघातील विविध निवडणूकात शिवसेनेची ताकद दाखवून दिली आहे.

माण पंचायत समितीतही त्यांनी शिवसेनेचा (Shivsena) सभापती करून पंचायत समितीवर भगवा फडकवला होता. नगरपंचायतीतही शिवसेनेचे नगरसेवक म्हणून काहीजण काम करत आहेत.जि.बँक निवडणूकीत सर्व विरोधक एकत्र येऊनही त्यांनी माण सोसायटी मतदारसंघातून विजय मिळवित शिवसेनेचा संचालक म्हणून बँकेत प्रवेश केला होता.त्यांच्या कार्याची हिम्मत पाहून पक्षश्रेष्टी त्यांच्याकडे मोठी जबाबदारी देतील अशी सर्वांनाच अपेक्षा होती.

युवा नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही काही दिवसापूर्वी याबाबत सूचक विधान केले होते.नितीन बानुगडे पाटील यांचा कार्याचा आवाका पाहून त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख पदाची संधी देण्यात आली.त्यामुळे सातारा संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी कोणाकडे द्यायची यावर पक्षश्रेष्ठींही धाडसी व युवा नेत्याची चाचपणी करत होते. माण मतदारसंघात आपल्या स्वकर्तृत्वाच्या जोरावर पक्षाची ताकद वाढवणाऱ्या शेखर गोरेंच्या रूपाने पक्षश्रेष्ठींना या पदासाठी योग्य व्यक्ती दिसत होती. यावर त्यांनी शिक्कामोर्तब करत त्यांच्याकडे सातारा जिल्ह्याची संपर्कप्रमुख पदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.यामुळे माणसह सातारा जिल्ह्यातील शिवसेनेत नवचैतन्य निर्माण होणार असून शेखर गोरेंनाही आपल्या नेतृत्वाची झलक जिल्ह्यात दाखवण्याची संधी मिळणार आहे.

CM Eknath Shinde, Uddhav Thackeray Latest News
Pune News : राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर रिक्षा संघटनांचे पदाधिकारी आपसातच भिडले

जि.बँकेचे संचालक शेखर गोरे यांची शिवसेना सातारा जिल्हा संपर्कप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल उध्दव ठाकरे , खासदार संजय राऊत , आदित्य ठाकरे, विनायक राऊत , दिवाकर रावते, अनिल देसाई, मिलींद नार्वेकर, दगडूदादा सपकाळ, प्रा. नितीन बानुगडे पाटील आदी प्रमुख मान्यवर तसेच जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, शिवसैनिकांनी अभिनंदन केले आहे.

दरम्यान, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेबांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासास पात्र राहत जि. बँकेत शिवसेनेचा संचालक म्हणून काम पाहतोय. नुकतीच आपल्यावर पक्षश्रेष्ठींनी जिल्हा संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी दिली असून माण मतदरसंघासह जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात सर्व पदाधिकारी ,शिवसैनिकांच्या साथीने शिवसेनेची ताकद वाढवून उध्दव ठाकरेंच्या पाठीशी ताकद उभी करू, असा विश्वास शेखर गोरेंनी व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com