Patan : ठाकरे सेनेच्या महाप्रबोधन यात्रेचा मायनस शून्य टक्के परिणाम होईल : देसाई

Shambhuraj Desai उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा पाटण मतदारसंघात आल्यानंतर त्यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेला मंत्री देसाई यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले.
Udhav Thackeray, Shambhuraj Desai
Udhav Thackeray, Shambhuraj Desaisarkarnama

Satara News : 2024 ची निवडणूक लांब नाही महाविकास आघाडीला Mahavikas Aghadi माझ्या मतदारसंघात तळ ठोकून राहू द्या. गुलाल किती कुणाच्या अंगावर पडतोय हे माझी जनता दाखवून देईल. मागील ग्रामपंचायत निवडणुकीत आमचा जलवा दिसून आला आहे. आम्हाला बोलायची सवय नाही तर आम्ही कामातून उत्तर देतो. ठाकरे सेनेच्या महाप्रबोधन यात्रेचा पाटण मतदारसंघावर मायनस शून्य टक्के परिणाम होईल, असे प्रतिउत्तर सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांनी दिले आहे.

उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा पाटण विधानसभा मतदारसंघात आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली. या टीकेला मंत्री शंभूराज देसाई यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले. मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, त्यांच्या टीकेला उत्तर देण्याएवढ्या त्या मोठ्या नाहीत. माझे कार्यकर्तेच त्यांना योग्य उत्तर देत आहेत.

कोण कुणाचा वारसा जपतो हा माझ्या मतदारसंघासह जिल्हा जाणतो. त्यांच्या बोलण्याने पाटण विधानसभा मतदारसंघात काय प्रतिक्रिया आल्यात हे त्यांनी पाहून घ्यावे. लोकांना मी शांत राहण्याचे आवाहन केलं आहे. माझ्या मतदारसंघातील लोक माझ्याशी एकनिष्ठ आहेत. अशा टीकांचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही.

Udhav Thackeray, Shambhuraj Desai
Patan : मुख्यमंत्र्यांच्या वाढदिनी शंभूराज देसाईंनी दिली ही अनोखी भेट...

2024 ची निवडणूक लांब नाही महाविकास आघाडीला माझ्या मतदारसंघात तळ ठोकून राहू द्या. गुलाल किती कुणाच्या अंगावर पडतोय हे माझी जनता दाखवून देईल. मागील ग्रामपंचायत निवडणुकीत आमचा जलवा दिसून आला आहे. आम्हाला बोलायची सवय नाही तर आम्ही कामातून उत्तर देतो.ठाकरे सेनेची महाप्रबोधन यात्रेचा पाटण मतदारसंघावर मायनस शून्य टक्के परिणाम होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Udhav Thackeray, Shambhuraj Desai
Patan News: मंत्री शंभूराज देसाईंची तत्परता; ५५ प्रवाशी सुखरूप घरी परतले....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com