Udayanraje Bhosale News: उदयनराजेंच्या पेंटिंगवरून तणावाचे वातावरण... देसाईंच्या भूमिकेकडे लक्ष

Shambhuraj Desai पालकमंत्र्यांचे सुपुत्र यशराज देसाई यांनी हरकत घेत देसाईसाहेब आल्‍यानंतर चर्चा करुन पुढील कारवाई करा, असे संबंधितांना सांगितले.
Tension in Satara over MP  Udayanraje's picture
Tension in Satara over MP Udayanraje's picturesarkarnama

Satara News : पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्‍या निवासस्‍थानाजवळ असणाऱ्या इमारतीच्‍या भिंतीवर खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचे छायाचित्र काढण्‍याच्‍या कारणावरुन गेल्‍या चार दिवसांपासून तणाव निर्माण झाला आहे. या तणावाच्‍या पार्श्वभूमीवर या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्‍त तैनात आहे. आज सकाळी पुन्हा हे चित्र काढण्याचे काम सुरु करण्यात आले. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत हे काम थांबवले, त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

साताऱ्यातील राहुल पाटोळे हे खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक असून त्‍यांनी खासदार उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्त तालीम संघाजवळील एका इमारतीच्‍या भिंतीवर त्यांचे मोठे छायाचित्र रेखाटले आहे. त्‍याच धर्तीवर त्‍यांनी पोवईनाका येथे असणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांच्‍या मालकीच्या इमारतीच्‍या भिंतीवर छायाचित्र काढण्‍यासाठीची तयारी सुरु केली होती.

क्रेनच्‍या माध्‍यमातून भिंत रंगविल्‍यानंतर शनिवारी त्‍याठिकाणी छायाचित्र काढण्‍याच्‍या कामास प्रत्‍यक्ष सुरुवात झाली. यासाठी आणलेली क्रेन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्‍या निवासस्‍थानाच्‍या प्रवेशव्‍दारावर उभी करण्‍यात येत होती. यास पालकमंत्र्यांचे पुत्र यशराज देसाई यांनी हरकत घेत देसाईसाहेब आल्‍यानंतर चर्चा करुन पुढील कारवाई करा, असे संबंधितांना सांगितले.

त्यानंतर बंदोबस्‍तावरील पोलिसांनी त्‍याठिकाणी आलेल्‍यांना हटकले. याची माहिती मिळाल्‍यानंतर शनिवारी रात्री त्‍याठिकाणी सातारा शहर पोलिस ठाण्‍याचे निरीक्षक भगवान निंबाळकर, शाहूपुरीचे संजय पतंगे हे दाखल झाले. त्‍यांच्‍यासोबत मोठा फौजफाटा होता. दरम्‍यान या प्रकाराची माहिती काहीजणांनी खासदार उदयनराजे भोसले यांना दिल्‍याची चर्चा सुरु झाली. या चर्चेमुळे पोलिस दल ॲक्‍शन मोडमध्‍ये आले व त्‍यांनी जलमंदिर येथील हालचालींवर जास्‍तीचे लक्ष केंद्रित केले.

Tension in Satara over MP  Udayanraje's picture
Udayanraje Birthday: हटके स्टाईल अन् डायलाॅगबाजी; उदयनराजेंचा अनोखा अंदाज

उदयनराजे त्‍याठिकाणी येतील, या शक्यतेवर शंभूराज देसाई यांच्‍या घराजवळ जास्‍तीचा पोलिस बंदोबस्‍त नेमण्‍यात आला होता. यानंतर पडद्याआड काही घडामोडी घडल्‍या आणि छायाचित्र रेखाटण्‍याचे काम थंडावले. हे काम थंडावले असले तरी त्‍याठिकाणचा पोलिस बंदोबस्‍त कायम होता. आज सकाळी ते काम पुन्‍हा सुरु झाले. छायाचित्राच्‍या मार्किंगचे थोडे काम झाल्‍यानंतर हे काम पुन्‍हा एकदा बंद करण्‍यात आले.

यानंतर तणाव निर्माण झाला व पोलिसांची तारांबळ उडाली. गेले चार दिवसांपासून भिंत, रंग, छायाचित्र आणि प्रतिष्‍ठेच्‍या केलेल्‍या मुद्यामुळे पोलिसांची अवस्‍था मांडवावर लटकणाऱ्या दोडक्‍यासारखी झाली आहे. आज सकाळी पुन्हा एकदा हे चित्र काढण्याचे काम सुरू झाले. पण, पोलिसांनी संबंधितांसह पेंटरला ताब्यात घेत सातारा शहर पोलिस ठाण्यात घेऊन गेले. त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com