रेणू शर्मांवरील कारवाई बद्दल बोलताना धनंजय मुंडेच्या डोळ्यात अश्रू : म्हणाले...

मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्याकडे पैशाची मागणी केल्या प्रकरणी मुंबई गुन्हे अन्वेशन विभाग व इंदोर पोलिसांनी संयुक्तपणे आरोपी रेणू शर्मा यांना अटक केली.
Dhananjay Munde on Renu Sharma, Dhananjay Munde Latest News Updates
Dhananjay Munde on Renu Sharma, Dhananjay Munde Latest News UpdatesSarkarnama

अहमदनगर - राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्याकडे पैशाची मागणी केल्या प्रकरणी मुंबई गुन्हे अन्वेशन विभाग व इंदोर पोलिसांनी संयुक्तपणे आरोपी रेणू शर्मा यांना अटक केली. या संदर्भात पत्रकारांशी बोलताना मंत्री धनंजय मुंडे यांना भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाले. ( Tears in Dhananjay Munde's eyes as he talks about Renu Sharma's action )

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील शिंदोरी या गावात संत भगवान बाबा यांच्या 88 व्या नारळी सप्ताह निमित्त काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनासाठी धनंजय मुंडे आले होते. भगवान गडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांचे कीर्तन झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (Dhananjay Munde on Renu Sharma)

Dhananjay Munde on Renu Sharma, Dhananjay Munde Latest News Updates
'कोल्हापूर उत्तर' : करुणा मुंडे यांना ६१ मत; निवडणूक रद्द करण्याची मागणी

धनंजय मुंडे म्हणाले की, काळ आला होता. पण भगवान बाबा यांच्यामुळे वेळ आली नव्हती, असं म्हणताच धनंजय मुंडे यांना अश्रू अनावर झाले.

Dhananjay Munde on Renu Sharma, Dhananjay Munde Latest News Updates
खंडणी मागणाऱ्या रेणू शर्माच्या अटकेनंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया..

मला दोघेही सारखेच

यावेळी नामदेव शास्त्री महाराज यांनीदेखील आपलं मत मांडलं. "मला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे दोघेही सारखेच. मात्र जो जवळ येणार त्याच्यावर मी प्रेम करणार. भगवानबाबाचे दरवाजे दोघांसाठीही उघडे आहेत. मात्र गडावर राजकीय भाषण नाहीच. माझ्या सर्व चौकशा झाल्या. मला बदनाम करण्याचा मोठे षडयंत्र रचले गेले. पण मी घाबरत नाही. मंदिराचे काम सध्या सुरू आहे. त्या मंदिराला लागणारा दगड हे गोपीनाथ मुंडे देणार होते. मात्र दुर्दैवाने ते होऊ शकले नाही. ते काम आज धनंजय मुंडे करणार आहेत", असे नामदेव शास्त्री महाराज म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com