'शरद पवारांना सोडून जाणाऱ्यांना धडा शिकवा'

पालकमंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांनी काल ( शनिवारी ) अकोले शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP ) उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतली.
 Hasan Mushrif
Hasan Mushrif Sarkarnama

अकोले ( अहमदनगर ) : अहमदनगर जिल्ह्यातील नगर पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सध्या सुरू आहे. यात अकोले नगर पंचायतीचाही समावेश आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांनी काल ( शनिवारी ) अकोले शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP ) उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतली. या वेळी त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड ( Madhukar Pichad ) व माजी आमदार वैभव पिचड यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. Teach a lesson to those who are leaving Sharad Pawar

या सभेला व्यासपीठावर आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हा सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक सीताराम गायकर, मच्छिंद्र धुमाळ, संपत नाईकवाडी आदींसह अनेक नेते उपस्थित होते.

 Hasan Mushrif
शरद पवार, मधुकर पिचड, गावित असे नेते चौदा किलोमीटर चालत त्या गावात पोहोचले होते..

हसन मुश्रीफ म्हणाले, आम्ही आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. आमदार लहामटे यांच्या वचनपूर्तीसाठी अकोले शहराच्या विकासासाठी तीन वर्षात 50 कोटी रुपयांचा निधी देतो, अन्यथा पुन्हा मते मागायला येणार नाही. गेल्या पाच वर्षात इतका निधी मिळाला नाही तेव्हढा निधी या दोन वर्षात दिला असून अकोले शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे मुश्रीफ म्हणाले.

 Hasan Mushrif
मधुकर पिचड यांना येथे दिसला पांडुरंग

ते पुढे म्हणाले की, एका माणसाला ज्येष्ठ नेत शरद पवार यांनी सर्व पदे दिली मात्र त्यांनी शेवटी शरद पवार यांना सोडून दिले. त्यांना धडा शिकवा. त्यासाठी भाजपच्या सर्व उमेदवारांचा पराभव करा. ओबीसी आरक्षण न मिळण्यास भाजप जबाबदार आहे, तरीही आम्ही ओबीसी आरक्षण मिळवून देणारच असे आश्वासन त्यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com