सोलापूरच्या दोन देशमुखांवर तानाजी सावंत भारी; पहिल्याच विस्तारात कॅबिनेट मंत्रीपदाची संधी

सावंत हे भूम-परांड्याचे आमदार असले तरी ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील माढ्याचे आहेत. ते उस्मानबादपेक्षा सोलापुरात जादा सक्रीय असतात.
सोलापूरच्या दोन देशमुखांवर तानाजी सावंत भारी; पहिल्याच विस्तारात कॅबिनेट मंत्रीपदाची संधी

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना बंडखोरीच्या काळात समर्थपणे साथ देणारे आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची कॅबिनेटपदी वर्णी लागली आहे. ते भूम परांड्याचे आमदार असले तरी ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असून त्यांचे उस्मानाबादपेक्षा सोलापूरमध्येच जादा लक्ष असते. विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे बडे नेते असलेले सुभाष देशमुख (Subhash Deshmukh), विजयकुमार देशमुख (Vijaykumar Deshmukh) यांना पहिल्या विस्तारात संधी मिळाली नाही. मात्र, शिंदे गटाकडून सावंत यांनी स्वतःची वर्णी लावत या दोन देशमुखांपेक्षा भारी ठरल्याची चर्चा आहे. (Tanaji Sawant appointed as cabinet minister in Shinde government)

एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारमधील १८ मंत्र्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे शपथ दिली. यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील (भाजप), सुधीर मुनगंटीवार (भाजप), चंद्रकांत पाटील (भाजप), विजयकुमार गावित (भाजप), गिरीश महाजन (भाजप), गुलाबराव पाटील (एकनाथ शिंदे गट), दादा भुसे (एकनाथ शिंदे गट), संजय राठोड (एकनाथ शिंदे गट), सुरेश खाडे (भाजप), संदीपान भुमरे (एकनाथ शिंदे गट), उदय सामंत (एकनाथ शिंदे गट), तानाजी सावंत (एकनाथ शिंदे गट), रवींद्र चव्हाण (भाजप), अब्दुल सत्तार (एकनाथ शिंदे गट), दीपक केसरकर (एकनाथ शिंदे गट), अतुल सावे (भाजप), शंभूराज देसाई (एकनाथ शिंदे गट), मंगलप्रभात लोढा (भाजप) यांचा समावेश आहे. भाजपकडून नऊ, तर मुख्यमंत्री शिंदे गटाकडून नऊ जणांनी शपथ घेतली आहे. आज शपथ घेतलेले सर्वजण हे कॅबिनेट मंत्री असणार आहेत.

सोलापूरच्या दोन देशमुखांवर तानाजी सावंत भारी; पहिल्याच विस्तारात कॅबिनेट मंत्रीपदाची संधी
अब्दुल सत्तार, संजय राठोड आक्रमक होताच शिंदे नरमले; कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी

दरम्यान, भूम-परांड्यातून निवडून आलेले तानाजी सावंत यांना मागील महाविकास आघाडी सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थान दिले नव्हते. त्यावेळी सावंत यांनी प्रचंड आकांडतांडव केले होते. पक्षप्रमुख ठाकरे यांना त्यांनी उघडपणे आव्हान दिले हेाते. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर सुरुवातीच्या काळात ते काहीसे अलिप्त होते. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून सक्रीय झालेल्या सावंत यांनी स्वतःच्याच सरकारवर टीकास्त्र सोडण्याचे काम केले होते. सोलापुरात झालेल्या युवा सेनेच्या मेळाव्यात त्यांनी वरुण सरदेसाई यांच्यासमोर सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला, त्यामध्ये सहभागी होत तानाजी सावंत यांनी समर्थपणे साथ दिली होती. सुरुवातीच्या काळात त्यांनी माध्यमांशी बोलण्याचे कामही केले होते. शिवसैनिकांनी त्यांचे पुण्यातील कार्यालयही फोडले होते, त्यानंतर त्यांच्या मुलाने शिवसेनेला थेट इशारा दिला होता.

सोलापूरच्या दोन देशमुखांवर तानाजी सावंत भारी; पहिल्याच विस्तारात कॅबिनेट मंत्रीपदाची संधी
बिहारमध्ये भूकंप! नितीशकुमार सरकार कोसळले : भाजपच्या १६ मंत्र्यांचा राजीनामा

सावंत हे भूम-परांड्याचे आमदार असले तरी ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील माढ्याचे आहेत. ते उस्मानबादपेक्षा सोलापुरात जादा सक्रीय असतात. एकनाथ शिंदे गटाकडून सावंत यांना कॅबिनेट मंत्रीपदावर वर्णी लावण्यात आले. पण, सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील यांना पहिल्या विस्तारात संधी मिळाली नाही. मात्र, सावंत हे त्यांच्यावर भारी ठरले आहेत. आता सोलापूरचे पालकमंत्री कोण होणार, हे पाहणे ठरणे महत्वाचे आहे. कारण सावंत हेही सोलापूरच्या पालकमंत्रिपदासाठी इच्छूक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मागील वेळी भाजपचे विजयकुमार देशमुख हे पालकमंत्री होते, त्यामुळे या दोन देशमुखांऐवजी या वेळी सावंत पालकमंत्री होणार का, अशी चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com