Tambe Vs Kote : मेहुणा-भाच्याच्या लढतीचे बाळासाहेब थोरातांना टेन्शन?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांचे दोन नातेवाईक एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी सज्ज होत आहेत.
Sudhir Tambe Vs Sangram Kote
Sudhir Tambe Vs Sangram KoteSarkarnama

Tambe Vs Kote : नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक जवळ आली आहे. त्यादृष्टीने मतदार याद्या तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे. अशा वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांचे दोन नातेवाईक एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी सज्ज होत आहेत. त्यामुळे थोरातांच्या चिंता वाढल्या आहेत.

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. सात नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणीची अंतिम तारीख आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे हे आहेत. तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून माजी प्रदेशाध्यक्ष असलेले व सध्याचे प्रदेश सचिव संग्राम कोते यांनी निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. डॉ. तांबे हे थोरातांचे मेहुणे आहेत. तर कोते हे भाचे आहेत.

Sudhir Tambe Vs Sangram Kote
साईसंस्थानच्या अध्यक्षपदाबाबत राष्ट्रवादीचे संग्राम कोते नाराज आहेत का?

विधानपरिषदेच्या मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोते यांना तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या मात्र मतांचे विभाजन नको हे कारण देत कोते यांना माघार घ्यावी लागली होती. त्यावेळी कोते यांनी साठ हजारावर मतदान नोंदणी घडवून आणली होती. भाजप विरोधातील मतदान विभाजित होऊ नये या हेतूने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होऊन सुधीर तांबे यांना उमेदवारी देत संग्राम कोते यांना माघार घेण्यास सांगण्यात आलेले होते.

Sudhir Tambe Vs Sangram Kote
आमदार सुधीर तांबे यांचा घरचा आहेर ! म्हणाले सरकारचे शिक्षणाकडे दुर्लक्ष

संग्राम कोते हे अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात. नाशिक पदवीधर मतदारसंघांमध्ये नाशिक, नगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थात्मक बळ असून राष्ट्रवादी काँग्रेसने मतदान नोंदणीसाठी कंबर कसली आहे. तर तांबे यांची यंत्रणा मागील सहा महिन्यांपासून या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी मोहीम राबवित आहे. बाळासाहेब थोरात व तांबे यांनी मागील आठवड्यात जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारीही पदवीधर मतदार नोंदणीच्या कामाला लागले आहेत. अशातच संग्राम कोते यांनी दंड थोपटल्याने थोरातांच्या चिंता वाढल्या आहेत. डॉ. तांबे हे दोन वेळा मतदार संघाचे प्रतिनिधी होते. त्यांचे पाच जिल्ह्यात उत्तम नेटवर्क असून ते सातत्याने मतदारांच्या संपर्कात आहेत. कोते पुन्हा माघार घेणार की निवडणूक लढविणार यावर आता उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

Sudhir Tambe Vs Sangram Kote
खोटं बोलायचं, हेच भाजपचे धोरण : डाॅ. सुधीर तांबे

नाशिक पदवीधर निवडणूक लढविण्यासाठी मी इच्छुक आहे. मागील वर्षी ऐनवेळी पक्ष आदेशामुळे मला माघार घ्यावी लागली होती. मात्र यंदा मी पुन्हा राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. पक्षाने संधी दिल्यास मी निश्चित यश मिळवेल.

- संग्राम कोते, प्रदेश सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com