पदवीधरमध्ये राष्ट्रवादीकडून काँग्रेसची कोंडी

नाशिक पदवीधर मतदारसंघावर संगमनेरचे आमदार डॉ. सुधीर तांबे ( Dr. Sudhir Tambe ) यांचे वर्चस्व आहे.
BJP, Congress and NCP
BJP, Congress and NCPSarkarnama

अशोक निंबाळकर

Tambe Vs Kote : नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी मतदारनोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. उत्तर महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या या मतदारसंघावर संगमनेरचे आमदार डॉ. सुधीर तांबे ( Dr. Sudhir Tambe ) यांचे वर्चस्व आहे. या निवडणुकीसाठीही त्यांनी आधीच मोर्चेबांधणी केली आहे. भाजपच्या ताब्यातून त्यांच्या माध्यमातून काँग्रेसने हा मतदारसंघ खेचून आणला होता. तेव्हापासून त्यावर वर्चस्व राखले आहे. परंतु आता त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम कोते यांचे आव्हान उभे राहू शकते. त्यांनीही निवडणूक तयारी सुरू केलीय.

नाशिक पदवीधर मतदारसंघात मतदारनोंदणी प्रक्रिया ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तब्बल तीन महिने ही प्रक्रिया चालणार आहे. त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये निवडणुकीची शक्यता आहे. यापूर्वी डॉ. तांबे यांच्या यंत्रणेमार्फत मतदारनोंदणी केली होती, परंतु निवडणूक पुढे ढकलल्याने ती रद्द झाली. आता नव्याने ही प्रक्रिया सुरू होणार असल्याने त्यांची यंत्रणा अलर्ट झाली आहे. दुसरीकडे कोते पुन्हा ॲक्टीव्ह झाले आहेत. मागील निवडणुकीत मतांची विभागणी टाळण्यासाठी निवडणुकीतून त्यांना माघार घ्यावी लागली.

BJP, Congress and NCP
सत्यजित तांबे म्हणाले, आमचा नेमका मित्र कोण हे कळत नाही

तिकडे भाजपकडून धुळ्याचे विसपुते इच्छुक आहेत. मागील वेळी नाशिकचे प्रशांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, डॉ. तांबे यांनी तब्बल पाऊण लाख मतांनी त्यांचा पराभव केला होता. नाशिक आणि नगर हे दोन जिल्हेच या मतदारसंघावर कमांड ठेवून आहेत. गेल्या वेळी नाशिकची 1 लाख 10 हजार, तर नगरची मतदारसंख्या 90 हजार होती. ही मतदारसंख्याच निर्णायक ठरते. नाशिक, नगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या मतदारसंघांचा विस्तार आहे.

BJP, Congress and NCP
बाळासाहेब थोरातांच्या घरात कोणाशी बोलायचे हा माझ्यासमोर प्रश्न

भाचे अन मेहुणे

डॉ. तांबे हे माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे आहेत. त्यांच्या माध्यमातून डॉ. तांबे यांनी अनेक कामे मार्गी लावल्याचे समर्थक सांगतात. युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांचे ते वडील आहेत, तर संगमनेर नगरपरिषदेच्या माजी अध्यक्ष दुर्गा तांबे यांचे ते पती आहेत. कोते हे थोरात यांचे भाचे आहेत. ते राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत.

काय केले?

डॉ. तांबे यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवले आहेत. डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबतही त्यांनी परिपत्रक काढण्यासाठी प्रयत्न केले. सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांकडेही त्यांनी वेळोवेळी लक्ष वेधले. पदवीधर, वकील, अभियंता यांच्यातही त्यांचा वावर असतो. या निवडणुकीसाठीही तयारी आहे, असे माध्यमिक शिक्षक बँकेचे संचालक चांगदेव खेमनर यांनी ‘सकाळ’सोबत बोलताना सांगितले.

BJP, Congress and NCP
शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे सत्यजित तांबे गंभीर : पोलीस महासंचालकांकडे केली ही मागणी

टीडीएफचे काय?

नाशिक पदवीधर मतदारसंघात टीडीएफची मोठी ताकद आहे. सुमारे 70 हजार शिक्षक या संघटनेत कार्यरत आहेत. मागील निवडणुकीत टीडीएफने डॉ. तांबे यांना पाठिंबा दिला होता. या संघटनेकडून अद्यापि कोणीही उमेदवारी मागितली नाही. त्यामुळे टीडीएफ यावेळीही तांबे यांना पुरस्कृत करू शकते. हिरालाल पगडाल यांचा संघटनेवर पगडा आहे. आम्ही पाठिंबा देतो तेच विजयी होतात, असा दावा पगडाल यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com