पिचडांच्या भूमिकेला शिवसेनेच्या तळपाडेंचाही पाठिंबा

शिवसेनेचे ( Shivsena ) जिल्हा उपाध्यक्ष मधुकर तळपाडे यांनीही भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड ( Madhukarrao Pichad ) यांच्या सुरात सूर मिसळला आहे.
Madhukar Talpade & Madhukarrao Pichad

Madhukar Talpade & Madhukarrao Pichad

Sarkarnama

अकोले ( अहमदनगर ) : आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी व सामाजिक प्रश्नावर भाजपचे ( BJP ) आमदार वैभव पिचड व राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) ज्येष्ठ नेते अशोक भांगरे एकत्र आले आहे. याच मुद्द्यावर आता शिवसेनेचे ( Shivsena ) जिल्हा उपाध्यक्ष मधुकर तळपाडे यांनीही भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड ( Madhukarrao Pichad ) यांच्या सुरात सूर मिसळला आहे. Talpade of Shivsena also supports the role of Pichad

बिरसा ब्रिगेडला विरोध करण्यासाठी मधुकर पिचड व वैभव पिचड यांनी संघटनात्मक प्रयत्न सुरू केले आहेत. बिरसा ब्रिगेडला आळा घालण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर तळपाडे यांनीही माजी आमदार वैभव पिचड व राष्ट्रवादी जेष्ठ नेते अशोक भांगरे यांच्या सुरात सूर मिसळून राजकीय जोडे बाजूला ठेवून सामाजिक प्रश्नावर एकत्र येण्याचे ठरविले आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात आदिवासींच्या प्रश्नावर संमती एक्स्प्रेस सुरू झाली आहे.

Madhukar Talpade & Madhukarrao Pichad

मला या वयात रस्त्यावर उतरायला भाग पाडू नका - मधुकरराव पिचड

याबाबत काल ( शुक्रवारी ) रंधा घोरपडा देवी मंदिरात झालेल्या खासगी कार्यक्रमात पिचड-भांगरे यांनी एकत्र येत आदिवासी समाजाच्या प्रश्नावर एकत्र येऊन तालुक्यात व राज्यात आदिवासी संस्कृती परंपरांकडे लक्ष वेधून घेतले. आदिवासी समाजात बिरसा ब्रिगेड व कुणी फुट पाडत असेल तर ते मुळीच सहन केले जाणार नाही, असे सांगत माजी आमदार वैभव पिचड, अशोक भांगरे एकत्र आले.

त्यापूर्वी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी याबाबत तालुका व राज्यात आदिवासी विकास परिषदेच्या वतीने जोरदार टीका करत आदिवासी समाजाने या अपप्रवृत्ती पासून दूर राहुन समाजात एकी करून येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले तर गावागावात प्रबोधन शिबिर घेऊन जोरदार टीका केली.

Madhukar Talpade & Madhukarrao Pichad

अकोलेतील राजकीय विरोधक भांगरे-पिचड आले एकत्र

तोच धागा पकडून अशोक भांगरे यांनी खासगी कार्यक्रमात आदिवासी समाजाने सामाजिक व धार्मिक गैरसमज पसरविणाऱ्या प्रवृत्ती पासून सावध राहण्याचे आवाहन करत माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे.

माजी आमदार वैभव पिचड व मधुकर तळपाडे हे एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. प्रत्येक निवडणुकीत परस्पर भूमिका बजावली होती. मात्र आदिवासींच्या प्रश्नावर मधुकर तळपाडे यांनी आपली भूमिका स्पष्ट करून अशोक भांगरे यांनी घेतलेली भूमिका योग्य असल्याचे म्हटले आहे.

Madhukar Talpade & Madhukarrao Pichad

आमदार लहामटे साहेब स्टंटबाजी बंद करा - दीपक वैद्य

राजकारणात आमचे जे नुकसान व्हायचे ते झाले मात्र आदिवासींच्या प्रश्नावर माजी मंत्री मधुकर पिचड यांनी घेतलेली भूमिका योग्य असून यापुढील काळात आदिवासी समाजात फुट पडणाऱ्या, गैरसमज पसरवला जातो अशा बिरसा ब्रिगेड संघटनेला आपला विरोध आहे. आदिवासी समाजाच्या हितासाठी आपण निश्चित राजकीय जोडे बाजूला सारून एकत्र येऊन काम करू.

- मधुकर तळपाडे, जिल्हा उपाध्यक्ष, शिवसेना.

अकोले तालुक्यातील आदिवासी भागात काम करणारे कीर्तनकार, प्रवचनकार यांनीही याबाबत भूमिका घेऊन लवकरच रतनवाडी येथे निवृत्ती इंदुरीकर महाराज यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

- देवराम ईदे महाराज

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com