पालिकेच्या भ्रष्टाचारावर शिवेंद्रसिंहराजेंनी बोलणं म्हणजे, 'चोराच्या उलट्या बोंबा...'

उदयनराजेंनी Udayanraje Bhosale म्हटले की, ग्रेडसेपरेटरचे Grade Sepreter श्रेय मिळाले नाही म्हणूनच आमदारांचा MLA जळफळाट होत आहे. त्यांच्या कोल्हेकुईमुळे त्यांना थोडंतरी समाधान मिळावे.
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosaledesign@apglobale.com

सातारा : ''ग्रेडसेपरेटरचे श्रेय मिळाले नाही म्हणूनच आमदारांचा जळफळाट झाला आहे. त्यांच्या ग्रेडसेपरेटरच्या कोल्हेकुईमुळे त्यांना थोडंतरी समाधान मिळत असावे. तसेच भ्रष्टाचा-यांनी नगरपालिकेच्या भ्रष्टाचारावर बोलणं म्हणजे चोरांच्या उलटया बोंबा असून त्यात काहीही तथ्य नाही. व्यक्तीगत किंवा संस्थेचे असे कोणतेही नांव घेतले नसताना, त्यांनी आपल्या अंगावर ओढवून घेतले आहे. याचाच दुसरा अर्थ 'दाल मे कुछ काला नव्हे तर, शायद सबकुछ काला है' हे सातारकरांच्या लक्षात आले आहे,'' असे प्रतिउत्तर खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजेंना दिले आहे.

यासंदर्भात दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात उदयनराजेंनी म्हटले की, सहकारी संस्था या सभासद जनतेच्या सर्वांगिण विकासाकरीता स्थापन केल्या जातात. सभासदांचे जीवनमान उंचावणे हे सहकाराचे मुलतत्व किंवा गाभा आहे. सहकार तत्वांना तिलांजली देत, महाराष्ट्रात काही सहकारी संस्था कशा गिळंकृत केल्या गेल्या याविषयी वस्तुस्थिती मांडली. जे प्रकार घडले आहेत त्याची आम्ही फक्त जाहिर वाच्यता केली. या वाच्यतेमध्ये कोणत्याच आमदारांचे किंवा कोणत्या कारखान्याचा नामोल्लेख आम्ही केलेला नव्हता. तथापी खाई त्याला खवखवे याउक्तीप्रमाणे, उदयनराजे कोण असा प्रतिप्रश्न ते करीत असतील तर त्यांच्याच मनात खोट आहे. म्हणूनच त्यांनी गरळ ओकली आहे.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
शिवेंद्रसिंहराजे म्हणतात, सातारा पालिकेची निवडणूक आम्ही स्वबळावर लढणार

सहकारी संस्थांविषयीचे आमचे वक्तव्य फक्त त्यांनाच झोंबले. वास्तविक आमच्या त्या सर्वसाधारण भाष्यावर त्यांनी इतकी आगपाखड करण्याचे कारण नव्हते. ते अगदी व्यक्तीगत बाबींवरही घसरल्याचे पहायला मिळाले. वय वाढले की बुध्दी भ्रष्ट होते, अशी अजब संकल्पना मांडली. त्यांनी त्यांच्या पेक्षा सर्वच जेष्ठ असणा-यांच्या बाबतीत त्यांची असलेली वैचारिक दिवाळखोरी याव्दारे दाखवून दिली, असे स्पष्ट करून उदयनराजेंनी म्हटले की, कदाचित मानसिक संतुलन तात्पूरते का होईना त्यांचे बिघडले असावे. वाढत्या वयाप्रमाणे प्रगल्भता वाढण्याऐवजी बालीशपणाच वाढला असल्याने दुखः वाटते.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
वाढदिवसाच्या कार्यक्रमात उदयनराजेंचा डोंबाऱ्याचा खेळ बघितला...

कदाचित त्यांनी भ्रष्टाचार करुन मोडकळीत काढलेल्या जनतेच्या अनेक सहकारी संस्था आणि जनतेच्या कारखान्यात केलेला भ्रष्ट कारभार यांना शांत बसू देत नसावा म्हणूनच ते इतका आगपाखड करीत आहेत. तुमच्याबाबतीत काहीच कोण बोलले नाही. तरीही बुडाला आग लागण्याचे कारणच नव्हते. त्यांच्या एकंदरीत वक्तव्यावरुन निश्चितच दाल मे कुछ काला है हे सिध्द झाले आहे. आता यांनी पदाच्या जोरावर दबवून ठेवलेल्या मालक सभासदांनीच, स्वतःला न्याय मिळवण्यासाठी यांचा समाचार घ्यावा.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Video: आर्थिक निकषांवर आरक्षण देऊन टाका; उदयनराजे भोसले

कामाचे श्रेय घेण्याचा त्यांचा हावरटपणा सातारकरांना नवीन नाही, असे स्पष्ट करून उदयनराजेंनी म्हटले की, ग्रेडसेपरेटरचे श्रेय मिळाले नाही म्हणूनच आमदारांचा जळफळाट होत आहे. त्यांच्या कोल्हेकुईमुळे त्यांना थोडंतरी समाधान मिळावे. तसेच भ्रष्टाचा-यांनी नगरपरिषदेच्या भ्रष्टाचारावर बोलणं म्हणजे चोरांच्या उलटया बोंबा आहेत. व्यक्तीगत किंवा संस्थेचे असे कोणतेही नांव घेतले नसताना, त्यांनी आपल्या अंगावर ओढवून घेतले आहे. याचाच दुसरा अर्थ दाल मे कुछ काला नव्हे तर शायद सबकुछ काला है. हे सातारकरांच्या लक्षात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com