AAP News : ‘आप’चे पुढचे टार्गेट महाराष्ट्र : पंढरपूर ते रायगड स्वराज्य यात्रेतून पक्षबांधणीला सुरुवात

पंढरपूर येथून रविवारपासून (ता. २८ मे) सुरू झालेली स्वराज्य यात्रा ६ जून रोजी रायगडावर पोचणार आहे.
AAP's Swarajya Yatra
AAP's Swarajya Yatra Sarkarnama

सोलापूर : राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर आम आदमी पार्टीने महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. पक्ष बांधणीसाठी पक्षाकडून पाउले उचलली जात आहेत. स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून पक्ष बळकट करण्यात येणार आहे. पंढरपूर येथून रविवारपासून (ता. २८ मे) सुरू झालेली स्वराज्य यात्रा ६ जून रोजी रायगडावर पोचणार आहे. रविवारी सायंकाळी ती सोलापुरात दाखल झाली आहे. (Swarajya Yatra of 'AAP' from Pandharpur to Raigad from today)

आम आदमी पार्टीची (AAP) भूमिका गावोगावी घेऊन जाण्यासाठी या स्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांतून ही यात्रा जाणार असून ७८२ किलोमीटर एकूण प्रवास करणार आहे. या यात्रेदरम्यान गावोगावी सभा होणार आहेत.

AAP's Swarajya Yatra
Sahkar Shiromani Election : औदुंबरअण्णा पाटील गट फुटीच्या उंबरठ्यावर; काळे कारखाना निवडणुकीसाठी पाठिंबा देण्यावरून पाटील-पवारांमध्ये मतभेद

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय सहसचिव गोपाल इटिलिया यांना गुजरात विधानसेच्या निवडणुकीत १३ टक्के मतदान मिळाले आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रातही आप सक्रिय झाला आहे.

AAP's Swarajya Yatra
Maharashtra Politic's : राष्ट्रवादी करणार शिंदे-फडणवीस सरकारचा पर्दाफाश

या स्वराज्य यात्रेबद्दल माहिती देताना आम आदमी पार्टीचे सोलापूर (Solapur) जिल्हाध्यक्ष एम. पाटील यांनी सांगितले की, रविवारी सकाळी पंढरपूर येथून या यात्रेला प्रारंभ झाला आहे. पंढरपूर हे भक्तीस्थान असून रायगड हे शक्तीस्थान आहे. भक्ती व शक्तीचा संगम करून रयतेचे राज्य आणण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले आहे. तेच स्वप्न आपचे राष्ट्रीय निमंत्रक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे आहे.

AAP's Swarajya Yatra
Pandharpur Politic's : परिचारक गट काळेंच्या मदतीला जागला; धनंजय महाडिक कुणाच्या पारड्यात आपले वजन टाकणार

महाराष्ट्रात पुन्हा रयतेचे राज्य आणण्यासाठी आम आदमी पार्टी सज्ज झाली आहे. त्यासाठीच या स्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर शहरात रॅली काढण्यात आली असून त्यांनतंर टेंभुर्णीमार्गे पुणे येथे ही यात्रा जाणार आहे. येत्या ६ जून रोजी रायगड येथे ही यात्रा पोचणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com