Maan News : दुध दरासाठी 'स्वाभिमानी' रस्त्यावर; मार्डी चौकात चक्का जाम

Dahiwadi Andolan दहिवडीतील मार्डी चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दरासाठी आंदोलन केले.
Swabhimani Shetkari Sanghatna Andolan
Swabhimani Shetkari Sanghatna Andolansarkarnama

-रूपेश कदम

Maan News : 'दुधाचे दर पाडणाऱ्या सरकारचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय' अशा घोषणा देत माण तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज रस्त्यावर उतरत दूध दरासाठी आंदोलन केले. यावेळी मार्डी चौकात चक्का जाम करण्यात आला

तीव्र उन्हाळ्यामुळे दुधाच्या उत्पादनात घट Decrease in milk production झाली असतानाही खाजगी व सहकारी दूध संघाने दुधाचे दर पाच ते सहा रुपयांनी कमी केले आहेत. मात्र, पशुखाद्याचे दर कमी केलेले नाहीत. तसेच चाऱ्याचे दर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्यामुळे दुध उत्पादनाचा खर्च व उत्पन्न यांचे गणित जुळत नसल्याने दुध उत्पादक शेतकर्‍यांना Dairy farmers Pमोठा आर्थिक फटका बसत आहे.

त्यामुळे दुध दर पूर्ववत करावेत अशी मागणी करत स्वाभिमानीने आंदोलनाचा पवित्रा घेतला. यावेळी हर्षदा देशमुख-जाधव यांनी शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याच्या दुध दराबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेवून त्वरित हा विषय मार्गी लावावा अशी मागणी केली. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख यांनी दुधाचे दर कमी होवूनही लोकप्रतिनिधी अवाक्षर सुध्दा काढणार नसतील तर यासारखी दुर्देवी बाब नाही.

Swabhimani Shetkari Sanghatna Andolan
Swabhimani Sanghatna Andolan : शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्वाभिमानीने रोखला महामार्ग...

खाजगी दुध संघाची मनमानी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा दिला. शासनाने तत्काळ निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे तालुकाध्यक्ष राजू मुळीक म्हणाले. नगरसेवक महेश जाधव यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी कायम स्वाभिमानी सोबत असल्याची ग्वाही दिली. दूध उत्पादन खर्च व उत्पन्न यांचा मेळ बसत नसल्यामुळे बँकांची काढलेली कर्जे फेडायची कशी या विवंचनेत दुध उत्पादक अडकला आहे, असे मत राज्य युवा संघटक सूर्यभान जाधव यांच्यासह प्रसिध्दी प्रमुख केशव जाधव यांनी व्यक्त केले.

Swabhimani Shetkari Sanghatna Andolan
Raju Shetti : राजू शेट्टींची मोठी घोषणा : लोकसभा स्वतंत्रपणे लढणार ; 'या' मतदारसंघातून दंड थोपटणार..

जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकर्‍याला रस्त्यावर यावे लागते ही लज्जेची व शरमेची बाब असल्याचे प्रतिपादन प्रशांत विरकर यांनी केले. शासनाने पूर्वीप्रमाणेच पाच रुपये अनुदान द्यावे अशी मागणी माण-खटाव संपर्कप्रमुख शरद खाडे यांनी केली. माजी सभापती बाळासाहेब रणपिसे व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष इम्तियाज नदाफ यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर आसूड ओढत शासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Swabhimani Shetkari Sanghatna Andolan
BJP Political News : २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी भाजप वापरणार ८०च्या दशकातील 'हा' फॉर्म्युला

तहसिलदार विकास अहिर यांना निवेदन देवून आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी दहिवडीचे नगराध्यक्ष सागर पोळ, दिलीप तुपे, दत्तू घार्गे, नगरसेवक सुरेंद्र मोरे, शैलेंद्र खरात व शामराव नाळे, विकास जाधव, चंद्रकांत जगदाळे, अभिजित नायसे, आत्माराम जाधव, बाळासाहेब भोसले, नाना जगदाळे, अर्जुन जगदाळे, गौरीहर रोमन, अमर भोसले, ज्योतीराम जाधव, ज्ञानेश्वर निंबाळकर वैभव पाटील, शंकर मुळीक, आशिष मुळीक, सौरभ खाडे, तुषार काटे, सनी तुपे तसेच माण-खटाव मधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व शिलेदार व दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Swabhimani Shetkari Sanghatna Andolan
Pune Congress Bhavan Dispute : 'काँग्रेस भवन'वरून वाद चिघळला; मुळीकांची भेट घेऊन, पुस्तिका देणार भेट..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com