Swabhimani Sanghatna Andolan : शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्वाभिमानीने रोखला महामार्ग...

Swabhimani Shetkari Sanghatna : सातारा जिल्ह्यात सातारा, कराड, फलटण,वडूज, कोरेगाव या पाच ठिकाणी जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.
Swabhimani Shetkari Sanghatna andolan
Swabhimani Shetkari Sanghatna andolansarkarnama

Satara News : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न संदर्भात सत्ताधारी व विरोधक अशा दोघांनीही दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन केले. सातारा जिल्ह्यात सातारा, कराड, फलटण,वडूज, कोरेगाव या पाच ठिकाणी जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. साताऱ्यात बॉम्बे चौकात स्वाभिमानीच्या आंदोलकांनी अर्धातास महामार्ग रोखून धरला. त्यामुळे काही काळ वाहतुक कोंडी झाली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी चक्काजामचे आवाहन केले होते. यामध्ये महावितरणने शेती पंपाची विजबिल वसुली मोहिम तातडीने थांबवावी, तोडलेले कनेक्शन तत्काळ जोडून द्यावे, शेतकऱ्यांना दिवसा १२ तास विज उपलब्ध व्हावी, विज दरवाढीचा प्रस्ताव रद्द व्हावा, पंधरा दिवसात ऊस बिल न देणाऱ्या कारखान्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी,

टोळी मुकादमकडून वाहतूकदार शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून त्यावर शासनस्तरावर निर्णय होऊन सर्व ऊस वाहतूकदारांना न्याय द्यावा. सर्व वजन काटे ऑनलाइन करावेत. 50 हजाराचे प्रोत्साहनपर अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, आदी मागण्यासाठी हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

Swabhimani Shetkari Sanghatna andolan
Satara : सुडबुद्धीने वागणाऱ्या अधिकाऱ्यांचा पोलखोल करणार : शशिकांत शिंदे संतापले

यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुन भाऊ साळुंखे, कराड येथे पाचवड फाट्यावर पक्षाध्यक्ष देवानंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब यादव, वडूज येथे राज्यप्रमुख अनिल पवार, युवा जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख, फलटण येथे धनंजय महामुलकर व नितीन यादव यांनी कोरेगाव येथे पाच पथकामध्ये हे आंदोलन केले.

Swabhimani Shetkari Sanghatna andolan
Raju Shetti News : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर राजू शेट्टी नाराज; म्हणाले...

साताऱ्यात बॉम्बे चौकात राजू शेळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अर्धातास महामार्ग रोखून धरला. आंदोलकांनी उन्हान रस्त्यावर बसून राज्य शासनाचा निषेध केला. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, अशा जोरदार घोषणा दिल्या. महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाल्याने पोलिसांनी स्वाभिमानीच्या सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. सातारा शहर पोलिस ठाण्याची पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, सातारा तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री. बोडके यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Swabhimani Shetkari Sanghatna andolan
Delhi-Mumbai Expressway : गडकरींच्या video वर आनंद महिंद्रा म्हणाले, "ही जादू ..'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com