Mangalveda Bazar Samiti: मंगळवेढ्यात काकानंतर पुतण्याला संधी; बाजार समिती सभापतीपदी सुशील आवताडे बिनविरोध

Mangalveda APMC News: विष्णुपंत आवताडे हे १३ जानेवारी २००० रोजी मंगळवेढा बाजार समितीचे सभापती झाले होते, त्या दिवसापासून बाजार समितीवर आवताडे गटाची सत्ता आहे.
 Mangalveda Bazar Samiti Sabhapati Election
Mangalveda Bazar Samiti Sabhapati ElectionSarkarnama

मंगळवेढा (जि. सोलापूर) : मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सुशील आवताडे यांची, तर उपसभापतीपदी नानासाहेब चोपडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बाजार समितीवर २००० पासून आवताडेंची एकहाती सत्ता आहे. (Sushil Awatade as Chairman of Mangalveda Bazar Samiti)

सुशील हे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक बबनराव आवताडे यांचे सुपुत्र आहेत. यापूर्वी सुशील यांचे काका विष्णुपंत आवताडे यांनी बाजार समितीचे (Bazar Samiti) सभापती (Sabhapati) म्हणून २००० मध्ये काम केले आहे. त्यामुळे काकानंतर पुतण्याला बाजार समितीचे सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.

 Mangalveda Bazar Samiti Sabhapati Election
Bacchu Kadu News : मंत्रिपदावरून बच्चू कडूंची नाराजी कायम : म्हणाले, ‘जेवणाचं आमंत्रण जेवल्याशिवाय....’

बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीसाठी सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी ए.ए. गावडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली हेाती. त्यात संस्था मतदारसंघातून विजयी झालेले सुशील आवताडे यांचा सभापती, तर नानासाहेब चोपडे यांचा उपसभापती पदासाठी एकमेव अर्ज आले, त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी गावडे यांनी दोघांची बिनविरोध निवड जाहीर केली.

कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. यात तालुक्यातील सहकारी संस्थेचे ज्येष्ठ नेते बबनराव अवताडे आणि आमदार समाधान आवताडे या दोन्ही आवताडे गटांनी निवडणूक एकत्रित लढवत १३ जागा बिनविरोध करण्यात यश मिळविले होते. निवडणुकीतही पाच जागांवर आवताडेंच्या पॅनेलचे उमदेवार एकतर्फी विजयी झाले होते.

 Mangalveda Bazar Samiti Sabhapati Election
Akluj Bazar Samiti : अकलूजमध्ये पुन्हा मोहिते पाटील : मदनसिंहांकडे सलग चौथ्यांदा बाजार समितीची धुरा; पांढरेंना एकनिष्ठेचे फळ

दरम्यान, नवे सभापती सुशील आवताडे हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष बबनराव अवताडे यांचे सुपुत्र आहेत. बाजार समितीचे संस्थापक किसनलाल मारवाडी वकील यांच्या पश्चात बबनराव आवताडे यांचे बाजार समितीवर एकहाती वर्चस्व राहिले आहे. त्यांचे पुत्र सिद्धेश्वर आवताडे हे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष आहेत. मारवाडी वकिलांच्या पश्चात या दोन्ही संस्था आवताडेंच्या ताब्यात आहेत.

विष्णुपंत आवताडे हे १३ जानेवारी २००० रोजी मंगळवेढा बाजार समितीचे सभापती झाले होते, त्या दिवसापासून बाजार समितीवर आवताडे गटाची सत्ता आहे. बबनराव आवताडे यांनी ही सत्ता कायम राखली आहे. त्यांच्याशी यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी युती केली आहे.

 Mangalveda Bazar Samiti Sabhapati Election
Bhandara Bazar Samiti: भाजपचा पुन्हा काँग्रेसच्या गडाला सुरुंग; उमेदवार फोडून बाजार समितीवर भाजप-शिवसेना- राष्ट्रवादीची सत्ता

विष्णुपंत आवताडे, सुशील आवताडे, सिध्देश्‍वर आवताडे, नानासाहेब चोपडे, आनंद बिले, मनोज चव्हाण, प्रकाश जुंदळे, धन्यकुमार पाटील, सहदेव लवटे, बिराप्पा माळी, बबनराव अवताडे, बसवेश्वर पाटील, प्रवीण कोंडुभैरी, कविता बेदरे, सविता यादव, जगन्नाथ रेवे, गंगाधर काकाणकी, पांडुरंग कांबळे हे नवनिर्वाचित संचालक आहेत. ज्येष्ठ नेते बबनराव अवताडे यांच्या हस्ते सभापती उपसभापतींचा निवडीनंतर सत्कार करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com