सत्तारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; ‘जे काही घडलं ते घृणास्पद होतं...’

माझ्या संदर्भात सत्ताधारी पक्षाच्या एका व्यक्तीने जे गलिच्छ विधान केले, त्याची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रतिक्रिया उमटली, यात काही आश्चर्य नाही.
Supriya Sule- Abdul Sattar
Supriya Sule- Abdul SattarSarkarnama

मुंबई : जे काही घडलं ते घृणास्पद होतं. मात्र त्यावर उमटलेली प्रतिक्रिया ही महाराष्ट्राचा सुसंस्कृत चेहरा स्पष्ट करणारी होती, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केलेल्या केलेल्या आक्षेपार्ह विधानावर दिली. (Supriya Sule's first reaction to Abdul Sattar's statement)

खासदार सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझ्या संदर्भात सत्ताधारी पक्षाच्या एका व्यक्तीने जे गलिच्छ विधान केले, त्याची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रतिक्रिया उमटली, यात काही आश्चर्य नाही. या प्रकारच्या भूमिकेचे समर्थन होत नसलं तरी याची जाण सगळ्यांनाच असते, असे नाही.

Supriya Sule- Abdul Sattar
अब्दुल सत्तारांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करा; अन्यथा.... : राज्यपालांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी आक्रमक

त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मला असे वाटते की कुणी चुकीच्या मार्गाने जात असेल व त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिक्रिया उमटत असेल तर त्याची नोंद करून आपण त्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज नाही. जे काही घडलं ते घृणास्पद होतं. मात्र, त्यावर उमटलेली प्रतिक्रिया ही महाराष्ट्राचा सुसंस्कृत चेहरा स्पष्ट करणारी होती. माझे सर्वांना असे विनम्र आवाहन आहे की, आपण सर्वजण आता याविषयी जास्त प्रतिक्रिया देऊ नये. सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अत्यंत गलिच्छ भाषेत टीकाटिप्पणी केली होती. त्यानंतर ते आपल्या विधानावर ठाम हेाते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर सत्तार यांनी दिलगिरी व्यक्त केली हेाती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तार यांच्या राजीनाम्यावर ठाम आहे.

Supriya Sule- Abdul Sattar
रूपाली चाकणकरांनी माझा फोनच उचलला नाही : सुषमा अंधारेंचा आरोप

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट घेतली. त्यात त्यांनी अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com