सुप्रिया सुळे यांना पंढरपुरात ब्राह्मण समाजाकडून घातला घेराव

Amol Mitkari|Supriya Sule :आमदार मिटकरी यांनी ब्राम्हण समाजातील पुरोहितांबद्दल केलेल्या वक्तव्यावर राज्यभर तीव्र पडसाद उमटले आहेत.
सुप्रिया सुळे यांना पंढरपुरात ब्राह्मण समाजाकडून  घातला घेराव
Supriya Sule in Pandharpur, Supriya Sule News, Pandharpur Latest News UpdatesSarkarnama

पंढरपूर : राष्ट्रवादी कॅाग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) हे सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरी राष्ट्रवादी पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ब्राम्हण समाज बांधवांनी पंढरपुरात (Pandharpur) श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनास आलेल्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना घेराव घालून केली आहे. (Supriya Sule in Pandharpur)

Supriya Sule in Pandharpur, Supriya Sule News, Pandharpur Latest News Updates
गुजरातमध्ये राजकारण तापलं; काँग्रेस आमदार जिग्नेश मेवानींना मध्यरात्री अटक

आमदार मिटकरी यांनी सांगली जिल्ह्यात झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात ब्राम्हण समाजातील पुरोहितांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले आहेत. दरम्यान, पंढरपूर मध्ये सुप्रिया सुळे आल्या असता येथील ब्राम्हण समाज बांधवांनी मिटकरींच्या वक्तव्याचा निषेध करत. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करत सुळे यांना घेराव घातला होता.

मिटकरी यांच्याकडून वारंवार अशा पद्धतीचे वक्तव्य केले जात आहे. यावेळी ब्राम्हण समाज बांधवांनी या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध म्हणून सुप्रियाताईंनी ट्विट करावे, अशी मागणी केली. यावर सुळे यांनी कानावर हात ठेवत याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितले. पण तुम्ही दुखावला असल तर मी सांगते. आपण वाईट वाटून घेऊन नका, अशा शब्दात त्यांनी ब्राम्हण समाज बांधवांची समजूत काढत वेळ मारून नेली. पण यावेळी ब्राम्हण समाज बांधव आक्रमक झाल्याचे दिसून आले.

Supriya Sule in Pandharpur, Supriya Sule News, Pandharpur Latest News Updates
मिटकरींचे मंत्रोच्चारण वादात; पुण्यात ब्राह्मण महासंघ आणि राष्ट्रवादीमध्ये तुफान राडा

दरम्यान, मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इस्लामपूर येथील संवाद सभेत भाष्य करताना पुरोहित वर्गाची आणि ब्राह्मण समाजाची खिल्ली उडवली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे ब्राह्मण समाजाकडून संताप व्यक्त करण्यात येत असून त्यांनी माफी मागावी, अशी मागणी होत आहे. ब्राह्मण महासंघाकडून करण्यात येत असलेल्या आंदोलनानंतर मिटकरींनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, मी कुठल्याही समाजाचा उल्लेख करत भाष्य केलेले नाही. तसेच, कुठलंही चुकीचं विधान केले नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.