Satara APMC Election : स्थानिक आघाड्यांना साथ; अनैसर्गिक युतीला नाकारले

Ramraje Nimbalkar रामराजे नाईक निंबाळकर, शिवेंद्रसिंहराजे, मकरंद पाटील, शशिकांत शिंदे, शंभूराज देसाई, पृथ्वीराज चव्हाण यांची आपापल्या मतदारसंघावर घट्ट पकड असल्याचे सिद्ध केले.
APMC Election Result
APMC Election Resultsarkarnama

Satara APMC Election News : आमदार, खासदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या बाजार समितींच्या निवडणुकीत मतदारांनी स्थानिक आघाड्यांना साथ दिली तर अनैसर्गिक युतीला नाकारले. पालकमंत्र्यांच्या पाटण बाजार समितीत तब्बल ४० वर्षानंतर राष्ट्रवादीच्या सत्तेचा अस्त होऊन देसाई गटाची सत्ता आली. तर वाई, लोणंद, सातारा, कोरेगाव व फलटण बाजार समितीत सत्ताधाऱ्यांनीच वर्चस्व कायम ठेवले. रामराजे नाईक निंबाळकर Ramraje Naik Nimbalkar, शिवेंद्रसिंहराजे, मकरंद पाटील, शशिकांत शिंदे, शंभूराज देसाई Shambhuraj Desai, पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांची आपापल्या मतदारसंघावर घट्ट पकड असल्याचे सिद्ध केले.

सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला तरी स्थानिक पातळीवर सर्वजण आपापल्या सोयीनुसार राजकारण करुन सत्ता स्थाने मिळवतात हे बाजार समितीच्या निवडणुकीत दिसून आले. कराडला बाळासाहेब पाटील व अतुल भोसले यांनी राष्ट्रवादी व भाजपची युतीच्या माध्यमातून काँग्रेसच्या ताब्यातील बाजार समिती हिसकावण्याचा प्रयत्न केला. पण, येथे भाजप, राष्ट्रवादीच्या अनैसर्गिक युतीला मतदारांनी नाकारले.

पृथ्वीराज चव्हाण, ॲड. उदयसिंह उंडाळकरांच्या काँग्रेसला साथ दिली. त्यामुळे काका गटाच्या साथीने पृथ्वीराज चव्हाणांची मतदारसंघावर पकड कायम राहिल्याचे स्पष्ट झाले. साताऱ्यात आमदार शिवेंद्रसिंहराजेंची सत्ता असलेल्या बाजार समितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून प्रवेश करण्याचा खासदार उदयनराजे गटाने प्रयत्न केला. पण, तो यशस्वी झाला नाही.

APMC Election Result
Sharad Pawar म्हणाले, मला कुठं थांबायचं कळतं' । NCP । Politics । Sarkarnama video

बाजार समितीच्या कारभारावर खासदारांनी आरोप करुनही मतदारांनी स्वाभिमानी व खासदार गटाच्या पॅनेलला नाकारत आमदार शिवेंद्रसिंहराजेंना साथ दिली. त्यामुळे साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजेंचीच पक्कड मजबूत असल्याचे सिद्ध झाले. कोरेगावात आमदार महेश शिंदे व राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यात काट्याची लढत झाली. येथे राष्ट्रवादीच्या एकजूटीला सभासदांनी साथ दिली. त्यामुळे शशिकांत शिंदेंच्या पॅनेलने मैदान मारले.

APMC Election Result
Patan APMC Result : पाटणला पालकमंत्र्याच्या पॅनेलची आघाडी; व्यापारीत राष्ट्रवादी पुढे...

त्यामुळे कोरेगावात राष्ट्रवादी एकवटली तर महेश शिंदेंनाही धोका निर्माण होऊ शकतो, हे या निकालातून दिसून आले. फलटणमध्ये माजी सभापती, आमदार रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण यांच्या राजे गटाने आपले निर्विवाद वर्चस्व राखले. रासप, शिवसेना, काँग्रेस, भाजप या अनैसर्गिक युतीला सभासदांनी नाकारले. त्यामुळे फलटणमध्ये राजे गटच सब कुछ है, हे दाखवून दिले.

APMC Election Result
Satara APMC Election: Udayanraje Bhosale यांच्या पॅनेलचा दारुण पराभव | Shivendraraje | Sarkarnama

वाई, लोणंदला राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांनी आपले वर्चस्व राखत वाई व लोणंद बाजार समितीत आपली सत्ता कायम राखली. त्यामुळे मकरंद पाटलांची पक्कड या मतदारसंघावर आजही कायम असल्याचे स्पष्ट झाले. वाईत आमदार मकरंद पाटलांना प्रभावी विरोधक नसल्याने आगामी निवडणुकातही त्यांना सोप्या जाण्याचे संकेत आहेत. तर खंडाळ्यात मताधिक्क्य घटल्याचे स्पष्ट झाले.

APMC Election Result
Phaltan APMC Result : राजेगटाचे निर्विवाद वर्चस्व; शिवसेना, रासप, काँग्रेसचा धुव्वा

वडूज बाजार समिती यापूर्वी काँग्रेसच्या ताब्यात होती, मागील निवडणुकीत प्रभाकर घार्गेंनी येथे परिवर्तन घडवले होते. यावेळेस प्रभाकर घार्गेंना आमदार जयकुमार गोरे, महेश शिंदे, दिलीप येळगावकर, रणजितसिंह देशमुख यांनी साथ दिली. तर विरोधात राष्ट्रवादीचे पॅनेल होते. राष्ट्रवादीच्या विरोधात सर्वजण एकवटल्याने घार्गेंना ही निवडणुक सोपी झाली. त्यांनी बाजार समिती पुन्हा ताब्यात ठेवली.

APMC Election Result
Vaduj APMC : प्रभाकर घार्गेंचे निर्विवाद वर्चस्व; राष्ट्रवादी, स्वाभिमानीला केवळ पाच जागा...

त्यामुळे खटाव तालुक्यात प्रभाकर घार्गेंची ताकत वाढल्याचे स्पष्ट झाले. जावळी महाबळेश्वर बाजार समितीत भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील या तीन आमदारांनी एकत्र येऊन विरोधी राष्ट्रवादी व शिवसेनेच्या पॅनेलची धोबी पछाड केली.

APMC Election Result
Chhatrapati Sambhajinagar APMC News : वज्रमुठ सुटली, शिंदेंच्या शिलेदारांनी गड राखले..

४० वर्षाच्या सत्तेला सुरुंग

पाटणला पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या देसाई गटाने निवडणूक ताब्यात घेतली होती. तर विरोधी राष्ट्रवादीकडूनही कडवा विरोध झाला. पण, पालकमंत्र्यांच्या गटाने राष्ट्रवादीला धुळ चारत ४० वर्षानंतर परिवर्तन घडवले. त्यामुळे पाटणमध्ये पालकमंत्र्यांची ताकत वाढल्याचे या निकालावरुन स्पष्ट झाले. आता राष्ट्रवादीच्या नेत्यांना आत्मपरिक्षण करावे लागणार आहे.

APMC Election Result
Karad Bazar Samiti : कराड बाजार समितीच्या विजयाचा गुलाल घेऊनच पृथ्वीराज चव्हाण कर्नाटकला रवाना

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com