जिल्हा बँकेत डावलूनही सुनील माने म्हणतात, मी चुकीची भूमिका घेणार नाही...

सुनील माने Sunil Mane यांच्यासह माघार घेणाऱ्या व मनाचा मोठेपणा दाखवणाऱ्या सर्वांना भविष्यात राष्ट्रवादीच्या Nationalist congress माध्यमातून संधी देण्याची ग्वाही आमदार मकरंद पाटील Makrand Patil यांनी दिली.
Sunil Mane
Sunil Manetwitter account

सातारा : ''आजवर मी कोणत्याही अमिषाला बळी पडलेलो नाही, तसेच कधीही चुकीची भूमिका घेतलेली नाही. मी पक्षाला मानणारा कार्यकर्ता आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माझ्यावर शंका असेल तर माझ्या मतांचा अधिकार साहेब तुम्हाला घ्या,'' असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी व्यक्त केले आहे.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सहकार पॅनेलच्या प्रचारानिमित्त कोरेगावात झालेल्या मतदारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, नितीन पाटील, लहूराज जाधव, उमेदवार शिवाजीराव महाडिक, प्रदीप विधाते, रामभाऊ लेंभे, कांचन साळुंखे, राजश्री पाटील तसेच शहाजी क्षीरसागर, मंगेश धुमाळ, राजाभाऊ जगदाळे, संजय साळुंखे, कांतीलाल पाटील, सुरेश साळुंखे, लालासाहेब शिंदे, तानाजीराव मदने, सुरेखा पाटील, शीला झांजुर्णे, भास्कर कदम, श्रीमंत झांजुर्णे, प्रताप कुमुकले आदी प्रमुख उपस्थित होते.

Sunil Mane
शशीकांत शिंदेंनी ते 100 कोटी घेतले असते तर संपत्ती दहा पट वाढली असती!

सुनील माने म्हणाले, "काही माणसे चुकीचा प्रचार करत आहेत. माझ्याविषयी कोणीही अपप्रचार करू नये. मी पक्षाला मानणारा कार्यकर्ता आहे. आजवर मी कोणत्याही आमिषाला बळी पडलो नाही, कधीही चुकीची भूमिका घेतली नाही. माझ्यावर शंका असेल, तर माझ्या मताचा अधिकार साहेब तुम्हाला घ्या."

Sunil Mane
राष्ट्रवादीची सरशी : मकरंद पाटील, राजेंद्र राजपुरे, शिवरूपराजे खर्डेकर जिल्हा बँकेवर बिनविरोध

सुनील माने यांच्यासह माघार घेणाऱ्या व मनाचा मोठेपणा दाखवणाऱ्या सर्वांना भविष्यात राष्ट्रवादीच्या माध्यमातून संधी देण्याची ग्वाही आमदार मकरंद पाटील यांनी पक्षाच्या वतीने दिली. यावेळी आमदार दीपक चव्हाण, शिवाजीराव महाडिक यांची भाषणे झाली. शहाजी क्षीरसागर यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com