Dr. Sujay Vikhe Patil : नगर-शिर्डी महामार्गासाठी सुजय विखेंचे गडकरींना साकडे

खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांना केंद्रीय रस्ते बांधणीमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.
Dr. Sujay Vikhe Patil, Union Minister Nitin Gadkari, Sadashiv Lokhande
Dr. Sujay Vikhe Patil, Union Minister Nitin Gadkari, Sadashiv LokhandeSarkarnama

Dr. Sujay Vikhe Patil : शिर्डी ( जि. अहमदनगर ) - अहमदनगर जिल्ह्यातील सावळीविहीर ते अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद पडले आहे. त्यामुळे शिर्डीला जाणाऱ्या प्रवाश्यांचे मोठे हाल होत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर भागातील हा महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याचे काम पुन्हा सुरू व्हावे यासाठी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांना केंद्रीय रस्ते बांधणीमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर शिर्डी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे बंडखोर खासदार सदाशिव लोखंडे होते.

सावळीविहीर ते अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील अर्धवट खोदकाम व खड्डे बुजविण्यासाठी पंधरा कोटी रुपयांचा निधी देऊ. या अर्धवट कामाच्या फेरनिविदा प्रक्रियेनंतर महिनाभरात नव्या ठेकेदाराची नियुक्ती करू, असे आश्‍वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.

Dr. Sujay Vikhe Patil, Union Minister Nitin Gadkari, Sadashiv Lokhande
वाळू आणि बदल्यांच्या पैशात अडकलेल्यांचा भविष्यात हिशेब होणार - सुजय विखे

महाराष्ट्रातून जाणाऱ्या विविध राष्ट्रीय महामार्गांच्या कामांबाबत राज्यातील खासदारांनी आज (गुरुवारी) त्यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. त्यात अहमदनगर जिल्ह्यातील खासदार डॉ. सुजय विखे पाटील व खासदार सदाशिव लोखंडे यांनी सावळीविहीर ते अहमदनगर या अर्धवट स्थितीत काम बंद असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या समस्येकडे त्यांचे लक्ष वेधले. त्यावेळी त्यांनी वरील आश्‍वासन दिले. खासदार डॉ. विखे पाटील यांनी त्यांच्याकडे अहमदनगर-पाथर्डी रस्त्याच्या कामासाठी आठ कोटी 45 लाख रुपयांचा वाढीव निधी देण्याची मागणी केली.

सुरत-हैदराबाद या नियोजित राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना शेतकऱ्यांसाठी दोन्ही बाजूंना दोन मीटर रुंदीचे कच्चे रस्ते तयार करणे गरजेचे आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधले. गडकरी यांनी या दोन्ही मागण्या मान्य केल्या. सावळीविहीर ते अहमदनगर रस्त्यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

Dr. Sujay Vikhe Patil, Union Minister Nitin Gadkari, Sadashiv Lokhande
रोहित पवारांच्या वक्तव्यावर सुजय विखे म्हणाले : फडणवीस हे तरूण, तेच योग्य निर्णय घेतील

निळवंडे कालव्यातून यंदा पाणी वाहू लागेल. कोपरगाव ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग व गोदावरी खोऱ्यातील पाण्याची तूट भरून काढणे ही महत्त्वाची कामे पुढील दोन वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मार्गी लागतील. आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही कामाच्या जोरावर जनतेकडे मते मागायला जाऊ. जनतेवर विश्वास आहे, विकासकामे मार्गी लावण्यासाठी आम्ही स्वीकारलेली वाट योग्यच आहे.

- सदाशिव लोखंडे, खासदार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com