सुजय विखे म्हणाले, अजित पवारांच्या आदेशानेच नगर जिल्ह्यातील गावांत लॉकडाऊन

अहमदनगर ( Ahmednagar ) जिल्ह्यातील 61 गावांत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले ( District Collector Rajendra Bhosale ) यांनी दहा दिवसांसाठी कडक लॉकडाऊन ( Lockdown ) जाहीर केला आहे.
सुजय विखे म्हणाले, अजित पवारांच्या आदेशानेच नगर जिल्ह्यातील गावांत लॉकडाऊन
sujay vikhe.jpgSarkarnama

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दहा दिवसांसाठी कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. या आदेशाला खासदार डॉ. सुजय विखे पाटलांनी विरोध करत आपले म्हणणे जिल्हाधिकारी भोसले यांना काल (सोमवारी) जिल्हाधिकारी कार्यालयात सांगितले. हा निर्णय अन्यायकारक असून भाजपतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. जिल्ह्यातील जामखेड, नगर व राहुरी तालुक्यांतील एकाही गावात लॉकडाऊन करण्यात आलेला नाही. Sujay Vikhe said that the lockdown in the villages of Nagar district was done only on the orders of Ajit Pawar

त्यानंतर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार पुणे आणि नाशिकला वाचविण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात येत आहे. भाजपची सत्ता असलेल्या मतदार संघातील गावांतच प्रामुख्याने लॉकडाऊन करण्यात येत असल्याचा आरोप करत त्यांनी राज्य सरकार व जिल्हा प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.

sujay vikhe.jpg
कोरोनाचा पुन्हा दणका : नगर जिल्ह्यात 61 गावांत लॉकडाऊन

खासदार सुजय विखे पुढे म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाऊनचा निर्णय का घेण्यात आला, कुणी घ्यायला लावला याचं उत्तर जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांनी द्यावं. जिल्ह्यातील भाजप आमदारांच्या मतदारसंघातच सर्रासपणे लॉकडाऊन लावलं जात असून सत्ताधारी पक्षांच्या मतदार संघात लावला जात नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

राज्यातील बाकी जिल्ह्यात आकडे लपवले जात असून कुठल्याही सत्तेतील पक्षाकडून अन्याय होत असेल तर आम्ही सहन करणार नाही. येत्या दोन दिवसांत याचा फेरविचार झाला नाही, तर भाजपतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही खासदार विखे पाटलांनी दिला आहे.

sujay vikhe.jpg
कोविड सेंटरवर फोटो काढणे एवढाच काहींचा उद्योग - खासदार डॉ. सुजय विखे पाटील

जिल्ह्यात काल 630 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 36 हजार 871 इतकी झाली आहे. काल जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 367 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 3 हजार 722 इतकी झाली आहे.

जिल्ह्यातील नगर, जामखेड व राहुरी तालुका वगळता जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांतील ग्रामीण भागांत कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संबंधित तालुक्यातील तहसीलदारांनी जास्त रुग्ण संख्या असलेली गावे लॉकडाऊन करण्यास सुरवात केली आहे. काल संध्याकाळपर्यंत जिल्ह्यातील 61 गावे लॉकडाऊन करण्यात आली. यात सर्वाधिक म्हणजे 24 गावे एकट्या संगमनेर तालुक्यातील आहेत.

sujay vikhe.jpg
प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामाला वेग द्या - खासदार डॉ. सुजय विखे पाटील

तालुका निहाय गावांची संख्या

अकोले 3, कर्जत 2, कोपरगाव 1, नेवासे 1, पारनेर 6, पाथर्डी 1, राहाता 7, संगमनेर 24, शेवगाव 4, श्रीगोंदे 9, श्रीरामपूर 3.

Related Stories

No stories found.