सुजय विखे म्हणाले, पुणतांब्यातील शेतकरी आंदोलनाला भाजपचे समर्थन राहिल...

खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी पुणतांब्यातील शेतकरी आंदोलनाविषयी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले.
Dr. Sujay Vikhe Patil News, Puntamba Farmer Protest news Updates
Dr. Sujay Vikhe Patil News, Puntamba Farmer Protest news UpdatesParesh Kapse

अहमदनगर - राज्यात ऊस मोठ्या प्रमाणात उसाची तोडणी झालेली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या इतरही प्रलंबित मागण्यांसाठी पुणतांबे येथील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या संदर्भात खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. ( Sujay Vikhe said, BJP will continue to support the farmers' movement in Puntamba ... )

डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, पुणतांबा येथून एक जूनपासून शेतकऱ्यांचे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला भाजपचे समर्थन राहणार आहे. पाच वर्षांपूर्वी पुणतांबा येथून सुरू झालेल्या पहिल्या आंदोलनाच्या वेळी आम्ही काँग्रेसमध्ये होतो. शिवसेनेकडे सत्ता होती. आता आम्ही भाजपमध्ये आहोत. शेतकऱ्यांना या सरकारकडून आशा, अपेक्षा राहिलेली नाही. त्यामुळे वीज, पाणी या प्रश्नावर आम्ही संघर्ष करत आहोत, असा टोलाही त्यांनी लगावला. (Dr. Sujay Vikhe Patil News)

Dr. Sujay Vikhe Patil News, Puntamba Farmer Protest news Updates
काँग्रेसला वाचवायचं असेल तर एकच पर्याय...! नाराज नेत्यांचा आक्रमक पवित्रा

डॉ. विखे पुढे म्हणाले की, मागील दोन महिन्यांत दूरचित्रवाहिनीवर अनेक विषयावर चर्चा सुरू होती. यात शेतकऱ्यांचा साधा उल्लेख देखील नव्हता. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही भूमिका घेत आंदोलने सुरू केली आहेत. ओबीसी आरक्षण, पाणी प्रश्न वीज प्रश्न यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने आंदोलने केली. शेतकरी आंदोलन हा कुठल्या पक्षाचा विषय नाही अथवा त्याकडे राजकीय दृष्टीने पाहणे ही योग्य नाही. पुणतांबा येथून सुरू होणाऱ्या शेतकरी आंदोलनाला पक्षाचा समर्थन राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. (Puntamba Farmer Protest news Updates)

अतिरिक्त उसाचा प्रश्न काही ठराविक भागातच आहे. या महिना अखेरपर्यंत हा प्रश्न राहणार नाही. अतिरिक्त कामगार लावून त्या त्या कारखाना क्षेत्रांतील लोकांनी उसाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Dr. Sujay Vikhe Patil News, Puntamba Farmer Protest news Updates
पुणतांब्याचे शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात : राज्य सरकारला सात दिवसांचा ‘अल्टीमेटम’

फडणवीसांच्या नियुक्तीचा परिणाम दिसेल

माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याचा आम्हाला आनंद आहे. फडणवीस यांच्या नियुक्तीचा फायदा निश्चितच जिल्ह्यात दिसेल, असेही डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com