सुजय विखेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिले आव्हान : म्हणाले...

खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी राज्यातील महाविकास आघाडीचे नेते केंद्रातील योजनांचे श्रेय लाटत असल्याचा आरोप केला.
Dr. Sujay Vikhe Patil
Dr. Sujay Vikhe PatilParesh Kapse

संगमनेर ( जि. अहमदनगर ) - संगमनेर तालुक्यातील निमोण येथे राष्‍ट्रीय वयोश्री योजनेतून ज्येष्‍ठ 614 नागरिकांना आमदार राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत सहायक साधनांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी बोलताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी राज्यातील महाविकास आघाडीचे नेते केंद्रातील योजनांचे श्रेय लाटत असल्याचा आरोप केला. ( Sujay Vikhe challenges Mahavikas Aghadi leaders: said ... )

डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, संगमनेर तालुक्यात सध्या केंद्र सरकारच्‍या योजनांचे श्रेय लाटण्‍याचे काम सुरू आहे. येथील रस्‍ते व पाणीयोजनांच्‍या कामांसाठीही केंद्रानेच निधी दिला. मात्र, पंतप्रधानांना त्याचे श्रेय देण्याची काहींची दानत नाही. केंद्राच्‍या निधीबाबत समोरासमोर येऊन कुठेही चर्चा करण्‍याची आपली तयारी आहे, असे थेट आव्‍हान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले.

Dr. Sujay Vikhe Patil
डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, शिवसेना संपवण्यासासाठी राष्ट्रवादीचा जन्म

ते पुढे म्हणाले, की संगमनेर तालुक्‍यात केंद्र सरकारने उपलब्‍ध करून दिलेल्‍या निधीतून राष्‍ट्रीय महामार्ग आणि पाणीयोजनांची कामे सुरू आहेत. मात्र, या सर्व कामांचे श्रेय तालुक्‍याचे नेतेच घेत आहेत. अधिकारीही कार्यकर्त्‍यांना जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. यापुढे कार्यकर्त्यांवरील अत्‍याचार सहन करणार नाही, असा इशाराही त्‍यांनी दिला.

डॉ. विखे पाटील यांच्‍या हस्‍ते तळेगाव, निमोण येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्‍या फलकांचे अनावरण करण्‍यात आले. याप्रसंगी भाजपचे तालुकाध्‍यक्ष डॉ. अशोक इथापे, शहराध्‍यक्ष श्रीराम गणपुले, किसान आघाडीचे सतीश कानवडे, सुदाम सानप, अॅड. श्रीराज डेरे, शैलेश फटांगरे, संदीप देशमुख यांच्‍यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Dr. Sujay Vikhe Patil
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, आदिवासींच्या जमीन खरेदीमध्ये मोठा गोंधळ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्‍वाखाली ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्राने काम सुरू आहे. समाजातील शेवटचा घटक विकासाच्‍या प्रवाहात आणण्‍याचे काम सुरू आहे. वयोश्री योजना ही त्‍याचाच भाग आहे. या योजनेच्‍या माध्‍यमातून जिल्‍ह्यातील ज्येष्ठ 40 हजार नागरिकांना साधन साहित्‍य उपलब्ध करून देता आल्‍याचे समाधान आहे.

- आमदार राधाकृष्ण विखे पाटील

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com