सुजय विखेंचे तनपुरेंना आव्हान : जबाबदारी स्वीकारा, मी स्वतः तुमच्या ताब्यात कारखाना देतो

खासदार डॉ. सुजय विखे ( Sujay Vikhe Patil ) यांनी आमदार प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांचा नामोल्लेख टाळून आव्हान दिले.
Sujay Vikhe Patil
Sujay Vikhe PatilSarkarnama

Sujay Vikhe Patil : डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची 67 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज झाली. या सभेत खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Sujay Vikhe Patil ) यांनी आमदार प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांचा नामोल्लेख टाळत टीकेची झोड उठविली.

सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे होते. उपाध्यक्ष दत्तात्रेय ढूस, ज्येष्ठ नेते ॲड. सुभाष पाटील, उदयसिंह पाटील, शामराव निमसे, चाचा तनपुरे, तान्हाजी धसाळ, उत्तम म्हसे, शिवाजी डौले, आर. आर. तनपुरे, राजेंद्र उंडे, प्रभारी कार्यकारी संचालक भाऊसाहेब सरोदे उपस्थित होते.

Sujay Vikhe Patil
Dr. Sujay Vikhe Patil : मंदिरे कोटींची अन् ज्ञानमंदिरे...

खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, तनपुरे साखर कारखान्याचा सभासद नाही. तालुक्याबाहेरचा पाहुणा कलाकार आहे. कारखान्याची जबाबदारी सहा वर्षे यशस्वीपणे सांभाळली. आता तालुक्याने ज्यांना आमदार केले. मंत्री झाले. आजोबांच्या नावाने कारखाना आहे. त्यांनी पुढाकार घ्यावा. जबाबदारी घ्यावी. मी स्वतः तुमच्या ताब्यात कारखाना देतो." अशा शब्दात खासदार डॉ. सुजय विखे यांनी टीका केली.

खासदार डॉ. विखे म्हणाले, "कारखान्याच्या कामगारांचे थकीत देणे अदा करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाने शासनातर्फे कारखाना मालिकेच्या जमिनींची लिलाव प्रक्रिया होत आहे. त्यात आमचा संबंध नाही. मागील सहा वर्षात मशिनरीचे आधुनिकीकरण केले. गाळप क्षमता अठराशे वरून चार हजार पर्यंत वाढविली. मागील हंगामात अकरा वर्षातील उच्चांकी गाळप, उच्चांकी साखर उतारा घेतला. कामगारांचे नियमित वेतन दिले. शेतकऱ्यांची राहिलेली ऊस बिले देणार आहे."

Sujay Vikhe Patil
Dr. Sujay Vikhe Patil : महसूलची बेकायदा वसुली बंद करणार

ते पुढे म्हणाले की, "कारखान्याची निवडणूक घ्यावी. म्हणून उच्च न्यायालयात याचिका करणे. पत्रकार परिषद घेऊन कारखाना बचाव कृती समिती स्थापन करण्याची; आंदोलन, संघर्ष, रस्त्यावर उतरण्याची गरज नाही. कारखाना तुमचा आहे. तुम्हीच चालवा. संचालक मंडळाची यादी द्यावी. स्वतःहून कारखान्याची जबाबदारी द्यायला तयार आहे. आम्ही भ्रष्टाचार केला. असे वाटत असेल तर कोणत्याही चौकशी तयार आहे."

"कारखान्याच्या कर्जाच्या वसुलीसाठी जिल्हा बँकेने प्रत्येक साखर पोत्यामागे पाचशे रुपयांची टॅगिंग मागितली आहे. त्यामुळे सभासदांना योग्य ऊसदर देणे अशक्य आहे. बँकेने पाचशे ऐवजी साडेतीनशे रुपये टॅगिंगची अट ठेवून कारखाना चालविण्याची निविदा काढावी. राज्यातील कुणीही पुढे येणार नाही.‌ बँकेने आम्हाला शंभर रुपये टॅगिंग मान्य केल्यास येत्या महिन्याभरात कारखान्याचा हंगाम चालू करू." असेही खासदार डॉ. विखे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com